घरदेश-विदेशLok Sabha 2024 : पश्चिम बंगालच्या या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा पत्नी मालामाल

Lok Sabha 2024 : पश्चिम बंगालच्या या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा पत्नी मालामाल

Subscribe

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील जलपायगुडी लोकसभा मतदारसंघातून लढणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपा उमेदवारांपेक्षा त्यांच्या पत्नी अधिक श्रीमंत असल्याचे समोर आले आहे. तर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार देबराज बर्मन यांच्याकडे पत्नीपेक्षा जास्त संपत्ती आहे. मात्र, त्यांच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. बँकेतील ठेवींच्या बाबतीत ते इतर उमेदवारांपेक्षा वरचढ आहे.

हेही वाचा – Congress : आता पाप करणारे भाजपात जातात, महाराष्ट्र काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल लक्ष्य

- Advertisement -

भाजपाचे उमेदवार डॉ. जयंतकुमार राय, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निर्मलचंद्र राय आणि माकपाचे उमेदवार देबराज बर्मन हे जलपायगुडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपापला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.

भाजपा उमेदवार डॉ. जयंत कुमार राय यांच्याकडे रोख 20 हजार रुपये आहेत. त्यांच्या पत्नीकडेही तेवढेच पैसे आहेत. जयंत कुमार राय यांच्या मालकीची स्थावर मालमत्ता आहे. बँक, विमा, 80 ग्रॅम सोने, मोटार याशिवाय त्यांच्याकडे एकूण 28 लाख 2 हजार 377 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या तुलनेत त्यांच्या पत्नीकडे 350 ग्रॅम सोन्याचे दागिने असून बँक आणि विमा मिळून त्यांच्याकडे सुमारे 26 लाख 56 हजार 974 रुपयांची संपत्ती आहे. जयंत कुमार राय यांच्याकडे शेतजमीनही आहे. ज्याची किंमत 30 लाख रुपये आहे. तर, पत्नीकडे जमीन आणि घरासह 91 लाख रुपयांची संपत्ती आहे. अशा प्रकारे पत्नी जयंत राय यांच्यापेक्षा श्रीमंत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Pawar : हा खऱ्या मागासवर्गावरील घोर अन्याय, रश्मी बर्वेंसंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया

रोख रकमेच्या बाबतीत, तृणमूलचे उमेदवार निर्मलचंद्र राय इतर सर्वांपेक्षा वरचढ आहेत. त्यांच्याकडे 1 लाख 20 हजार रुपये तर, पत्नीकडे 45 हजार 160 रुपयांची रोकड आहे. निर्मलचंद्र राय यांच्याकडे तीन वाहनेही आहेत. यासह बँकेत जमा रक्कम आणि विमा असे सुमारे तीन लाख रुपये त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या पत्नीकडे 26 लाख 96 हजार 286 रुपयांची संपत्ती असून त्यात विमा आणि 6 लाख 50 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहेत. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराकडे सुमारे 88 लाख 20 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, ज्यात 20 लाख रुपयांची कृषी आणि बिगरशेती जमीन तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर जमीन आणि धुपगुरी येथील घर आहे

माकपा उमेदवार देबराज बर्मन यांच्याकडे 35 हजार रुपये रोख आहेत. त्यांच्याकडे बँक, विमा, रोखे आणि दुचाकी अशी एकूण 43 लाख 9 हजार 348 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे 15 हजार रुपये रोख आहेत. पत्नी श्रीलेखा विष्णू यांच्या नावावर बँक, विमा, सोने अशी सुमारे 23 लाख 20 हजार 768 रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, त्यांच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही. तर, देबराज यांचे वडील दिनेशचंद्र बर्मन यांच्याकडे 2 कोटी 63 लाख 59 हजार 351 रुपयांची संपत्ती आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : वसंत मोरे- प्रकाश आंबेडकर भेटीने राज्यात नवे राजकीय समीकरण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -