घरमहाराष्ट्रRohit Pawar : हा खऱ्या मागासवर्गावरील घोर अन्याय, रश्मी बर्वेंसंदर्भात रोहित पवारांची...

Rohit Pawar : हा खऱ्या मागासवर्गावरील घोर अन्याय, रश्मी बर्वेंसंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (एनसीपी-एसपी) आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : प्रफुल्ल पटेलांना घोटाळ्याप्रकरणी क्लीनचीट मिळाल्यावर शरद पवारांचा भाजपावर निशाणा

- Advertisement -

जातपडताळणी समितीने काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अवैध ठरविल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. याचा मोठा फटका काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला बसणार आहे. तथापि, रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे यांनी रामटेक मतदारसंघातून डमी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता तेच तेथील काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भाजपाला पराभवाची भीती असल्यानेच विजयी होणाऱ्या काँग्रेस उमेदवाराचा आतापासून छळ सुरू झाला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात साम, दाम, दंड, भेद या सूत्रांचा वापर भाजपाने केला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. इतके झाले तरी काँग्रेस लढत राहणार आणि या निकालाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Thackeray group : भाजपाकडून जनतेची फसवणूक, प्रफुल्ल पटेलप्रकरणी ठाकरे गटाची टीका

आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या एनसीपी-एसपीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे निवडणूकच लढवता येऊ नये म्हणून रामटेकमध्ये काँग्रेस उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द करायचे तर दुसरीकडे न्यायालयाने जात प्रमाणपत्र बोगस ठरवलेल्या व्यक्तीला मात्र सन्मानाने उमेदवारी द्यायची, हा खऱ्या मागासवर्गावरचा घोर अन्याय आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. राजकारणासाठी सबका साथ, सबका विकास, अशी केवळ घोषणा देणारी भाजपा किती दुटप्पी आणि बोगस लोकांना अभय देऊन खऱ्या मागासवर्गीयांवर अन्याय करणारी आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही… निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -