घरमहाराष्ट्रNIlesh Lanke : अजित पवारांना मोठा धक्का; आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके...

NIlesh Lanke : अजित पवारांना मोठा धक्का; आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके शरद पवार पक्षात

Subscribe

अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज (29 मार्च) अहमदनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. (Big blow to Ajit Pawar Nilesh Lanke resigns from MLA in Sharad Pawar party)

हेही वाचा – Sharad Pawar : प्रफुल्ल पटेलांना घोटाळ्याप्रकरणी क्लीनचीट मिळाल्यावर शरद पवारांचा भाजपावर निशाणा

- Advertisement -

सुपा येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निलेश लंके यांनी आपली राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, पण आपल्याला लोकसभेला सामोरे जायचं असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. चार महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहे, असे निलेश लंके म्हणाले.

कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना निलेश लंके भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. निलेश लंके म्हणाले की, दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतो आहे. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असे म्हणत त्यांनी आपला राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही… निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट

दरम्यान, लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाला राम राम करत पुन्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षात घरवापसी करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच 15 दिवसांपूर्वीच निलेश लंके यांनी त्यांच्या “मी अनुभवलेला कोविड” या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते केले होते. यावेळी त्यांनी आज माझा कोणताही पक्षप्रवेश नाही, असे स्पष्ट करताना मी शरद पवारांच्या विचारधारेचाच असल्याचे म्हटले होते. यानंतर आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अमर काळेही शरद पवार गटात 

आर्वी (जि. वर्धा) विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -