घरक्राइमधक्कादायक! मोबाईलवर गेम न खेळू दिल्याने मुलानेच केली आईची हत्या

धक्कादायक! मोबाईलवर गेम न खेळू दिल्याने मुलानेच केली आईची हत्या

Subscribe

लहान मुलांना शांत करण्यासाठी आणि आपली कामे झटपट करण्यासाठी सध्या अनेक पालक आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देतात. मोबाईलमध्ये (Mobile) विविध प्रकारच्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना शांत करतात. परंतु, हाच मोबाईल आता पालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

लहान मुलांना शांत करण्यासाठी आणि आपली कामे झटपट करण्यासाठी सध्या अनेक पालक आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देतात. मोबाईलमध्ये (Mobile) विविध प्रकारच्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना शांत करतात. परंतु, हाच मोबाईल आता पालकांसाठी धोकादायक ठरत आहे. याच कारण म्हणजे एका १६ वर्षीये मुलाने मोबाईलवर गेम न खेळू दिल्यामुळे आईची हत्या (Murder of Mother) केली आहे. लखनऊनच्या पीजीआय परिसरात ही घटना घडली आहे.

रविवारी ही घटना घडली. मोबाईल गेम खेळू न दिल्याने मुलाने हत्या केली. त्यानंतर आपल्या १० वर्षीय बहिणीला खोलीत बंद केले आणि हा मुलगा आईच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. हत्या केल्यानंतर तब्बल तीन दिवस हा मुलगा आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता. आईचा मृतदेह कुजून त्यातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर मुलाने वडिलांनी फोन केला आणि हत्या झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरूवात केली.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

मुलाच्या आईने मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवले त्यामुळे रागाच्या भरात त्याने वडिलांची परवाना असणारी पिस्तूल घेतली आणि आईच्या डोक्यात गोळी झाडली. त्यामुळे त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पिस्तूल तिथेच बेडवर ठेवले आणि १० वर्षीय बहिणीला दुसऱ्या खोलीत बंद केले.

- Advertisement -

हेही वाचा – नाशकात एकाच दिवसांत ४ हत्या; तिघांवर प्राणघातक हल्ले

हा मुलगा आपली ४० वर्षीय आई साधना आणि १० वर्षीय बहिणीसोबत राहत होता. मुलाचे वडील लष्कर अधिकारी असून कोलकातामध्ये तैनात आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा तीन दिवस आईच्या मृतदेहासोबत घरात बसला होता. दुर्गंध बाहेर जाऊ नये यासाठी तो वारंवार घरात रुम फ्रेशनर मारत होता. दुर्गंध जास्त पसरु लागल्यानंतर मुलाने मंगळवारी संध्याकाळी वडिलांनी फोन करुन आईच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी थेट पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असल्याची माहिती मिळते.


हेही वाचा – भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्माला पोलीस नोटीस पाठविणार, वादग्रस्त विधानासंदर्भात लवकरच पोलिसांकडून चौकशी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -