घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत कोरोना डेल्टा विषाणूने बाधित १२८ रुग्ण

Live Update: मुंबईत कोरोना डेल्टा विषाणूने बाधित १२८ रुग्ण

Subscribe

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच कोविडच्या डेल्टा विषाणूने बाधित १२८ रुग्णांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य शासन, पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. तर मुंबईकरांसाठी ही बाब काहीशी चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची कडक पालन करावे असे आवाहन केले आहे.


भारताचे लसीकरण ५८.८२ कोटींच्या पुढे गेले आहे. आज देशात ५६ लाखांहून अधिक लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -


राज्यात गेल्या २४ तासात ३,६४३ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून राज्यात आज १०५ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे ६,७९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन ते सुखरुप घरी परतले आहेत. राज्यात सध्या ३ लाख २ हजार ८८८ रुग्ण होमक्वारंटाइन आहेत. तर २,४८७ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

- Advertisement -


मुंबईत गेल्या २४ तासात २२६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत आज २९७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलीय. मुंबईत आज २४,२८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईचा रिकव्हरी रेट सध्या ९७ चक्के इतका आहे.


 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एमएनपी म्हणजेच नॅशनल मॉनेटाइजेशन पाइपलाइन लाँच करण्यात आली आहे. केंद्र सरकार पुढील चार वर्ष आपली कोणतीही सरकारी संपत्ती विकल्यास किंवा मॉनिटाइज केल्यास त्याची एक यादी तयार करण्यात येईल.


मुंबई पालिका आणि गणेश मंडळातील बैठक संपली


राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.


राज्य सरकारकडून यंदाही दहीहंडीला परवानगी नाही. सणांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


राज्याचे माजी गृहमंत्री मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आज माजी मंत्र्यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे.


देशात गेल्या २४ तासांत २५ हजार ७२ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४४ हजार १५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २४ लाख ४९ हजार ३०६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३४ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १६ लाख ८० हजार ६२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ३३ हजार ९२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात शिगेला पोहोचणार आहे, असा इशारा गृहमंत्रालय (एणएचए) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (एनआयडीएम) पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या अहवालात देण्यात आला आहे.


ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. याच निमित्ताने आज मंत्री छगन भुजबळ दिल्ली दौऱ्यावर गेले असून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज व्हिसीद्वारे मुंबईतील दहीहंडी समन्वय समितीसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. यंदा दहीहंडी साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी दहीहंडी मंडळाने राज्य सरकारकडे विनंती केली आहे.


जगभरात अजूनही कोरोनाचा कहर काही थांबला नाही आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे बाधितांची संख्येत सातत्याने भर पडत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २१ कोटी २५ लाख पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४४ लाख ४४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १९ कोटी १ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात रविवारी ४ हजार १४१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आणि १४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४ हजार ७८० रुग्ण बरे होऊन गेले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख २४ हजार ६५१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३५ हजार ९६२ जणांचा मृत्यू झाला असून ६२ लाख ३१ हजार ९९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


रविवारी मुंबईत २९४ नवे कोरोनाबाधित आढळले असून १ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४१ हजार १६५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७ लाख १९ हजार ९०२ जण कोरोनामुक्त झाले असून १५ लाख ९४७ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -