घरCORONA UPDATECoronaVirus : महाराष्ट्र, गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाचे नवे रुग्ण 

CoronaVirus : महाराष्ट्र, गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाचे नवे रुग्ण 

Subscribe

महाराष्ट्र आणि गुजरातमधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मागील २४ तासांत अनुक्रमे ५९७ आणि ३३८ इतकी वाढ झाली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मागील २४ तासांत अनुक्रमे ५९७ आणि ३३८ इतकी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनामधून होणाऱ्या मृत्यूची संख्या ३२ ने वाढून ४३२ झाली आहे आणि गुजरातमध्ये मृत्यूची संख्या १६ ने वाढून १९७ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ३३,०५० पर्यंत पोहोचले आहे. या साथीच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा १०७४ झाला आहे. त्याच बरोबर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,३२५ झाली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडून देण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अंदमान निकोबारमध्ये गुरुवारी सकाळपर्यंत ३३ रुग्ण  आढळून आली. त्यापैकी १५ जण बरे झाले आहेत. आंध्र प्रदेशात १,३३२ कोरोनाबाधित झाले असून २८७ जण बरे झाले आहेत. येथे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये ही संख्या सातत्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार गुरुवारी पहाटेपर्यंत ३९३  रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६५ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. दोन येथे मरण पावले. गुरुवारी पहाटे पर्यंत चंदीगडमध्ये ५६ नवे रुग्ण नोंदवले, पैकी १७ बरे झाले. छत्तीसगडमध्ये ३८ रुग्ण मिळाले, तर ३४ बरे झाले.

- Advertisement -

राजधानी दिल्लीत कोरोनाबाधित लोकांची संख्या ३,४०० पार केली आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत ३,४३९ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले असून त्यापैकी १,०९२ रुग्ण बरे झाले आहेत, दिल्लीत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. गोवा कोरोना व्हायरस-मुक्त राज्य म्हणून कायम आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. येथे ४,०८२ रुग्ण कोरोनाने पीडित आहेत, ५२७ जणांना सोडून देण्यात आले आहे. गुरुवारी सकाळीपर्यंत १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणामध्ये १,०१० रुग्ण आढळून आले आहेत, तिघांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात ४० नवे रुग्ण मिळाले, पैकी २५ बरे झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ही आकडेवारी वेगाने वाढताना दिसते आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ५८१ रुग्ण आढळून आले, त्यापैकी १९३ जण बरे झाले, येथे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात अव्वल आहे. गुरुवारी सकाळपर्यंत राज्यात ९,९१५ रुग्ण संख्या झाली होती. १,५९३ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. येथे ४३२ जणांचा मृत्यूची नोंद झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -