घरताज्या घडामोडीJammu Kashmir: स्फोटकांनी भरलेला ड्रोन उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा रक्षकांना मोठं यश

Jammu Kashmir: स्फोटकांनी भरलेला ड्रोन उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा रक्षकांना मोठं यश

Subscribe

जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) स्फोटकांनी भरलेला ड्रोन उद्ध्वस्त करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना मोठं यश मिळालं आहे. सीमेपलिकडून अर्थात पाकिस्तानातून (Pakistan) हा ड्रोन ऑपरेट (Drone Operate) करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर दहशतवातवाद्यांचं मोठं कारस्थान असल्याचं बोललं जात आहे. परंतु त्यांचा हा घातपाताचा प्रयत्न फोल ठरला आहे.

कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तल्ली हरिया चाक भागात हा ड्रोन आकाशात फिरत होता. जो सीमेच्या बाजूनं येताना दिसला. हा ड्रोन पाडल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं त्याची कसून तपासणी केल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

या तपासणीनंतर या ड्रोनला ७ अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर आणि ७ चिकट आणि मॅग्नेटिक बॉम्ब लावले होते. मात्र, ही सर्व स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. तसेच यासंबंधीत पुढील तपास बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडकडून सुरू आहे, अशी माहिती कठुआच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

आज सकाळी कठुआ जिल्ह्यातील ताली हरिया गावातील एका शेतात हे ड्रोन सापडले. ड्रोनसह शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतील. त्यानंतर ड्रोन आपल्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय हद्दीत घुसले आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी ते पाहताच त्यावर गोळीबार करून ते पाडले. ड्रोनसह शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

- Advertisement -

एसएसपी रमेश कोतवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ड्रोन पाकिस्तानातून आला आहे. जम्मूहून बॉम्ब निकामी करणारे पथकही घटनास्थळी पोहोचले आहेत. हा ड्रोन दोन बॅटरीसारखा दिसत आहे आणि त्यावर चिनी भाषेत काहीतरी लिहिलं आहे. या सगळ्याचा तपास करण्यासाठी जम्मूहून तज्ज्ञांचे पथक येत आहे.


हेही वाचा : Nepal Tara Air plane : तब्बल सहा तासांनंतर लागला तारा एअरच्या विमानाचा शोध, ४ भारतीयांसह २२ प्रवासी सुरक्षित


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -