घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३भारत जोडो यात्रेचा पहिला 'परिणाम'; मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेत कर्नाटकात काँग्रेसचा मोठा विजय

भारत जोडो यात्रेचा पहिला ‘परिणाम’; मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेत कर्नाटकात काँग्रेसचा मोठा विजय

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गृह राज्यात काँग्रेसला मिळालेला हा मोठा विजय आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक झाली त्यात हिमाचल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. विशेष म्हणजे हिमाचल हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे गृहराज्य.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पायउतार होत आहे तर काँग्रेस १३० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता आहे. एक तृतीयांशांपेक्षा जास्त जागा काँग्रेसला मिळत आहेत. आता मुख्यमंत्री सिद्धरमय्या की डी.के.शिवकुमार यावर काँग्रेसमध्ये खल सुरु झाला आहे. त्यासाठी उद्या दिल्लीत बैठक होणार आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करेळमधून भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु केली होती. या यात्रेला कर्नाटकात मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी राहुल गांधी यांनी डी.के.शिवकुमार (DK Shivkumar) आणि सिद्धरमैय्या यांना सोबत घेऊन प्रवास केला होता. एका ठिकाणी तर दोघांचे हात हातात धरून राहुल गांधी धावले होते. तेव्हा हेच चित्र २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील का? असा सवाल विरोधकांकडून केला गेला. आज त्याचे उत्तर मिळाले आहे.

- Advertisement -

‘कर्नाटकातील सामान्य जनतेचा हा विजय’ असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. ‘कर्नाटकातील सामान्य जनतेने भांडलवलशाहीचा पराभव केला आहे. कर्नाटकमधील द्वेषाचे दुकान जनतेने बंद केले आहे,’ असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपचे नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गृह राज्यात काँग्रेसला मिळालेला हा मोठा विजय आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक झाली. तेव्हा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु होती. त्यात हिमाचल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. विशेष म्हणजे हिमाचल हा भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांचे गृहराज्य. म्हणजे एकीकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा त्यांच्याच गृहराज्यात पराभव तर काँग्रेसने खेळलेले दलित कार्ड कर्नाटकमध्ये यशस्वी झाले आहे.

- Advertisement -

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचीही दमदार सुरुवात मानली जात आहे. यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाणा आणि मिझोराम या राज्यांच्याही विधानसभा निवडणुका आहेत.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा २०२३ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका ज्या-ज्या राज्यात आहेत तेथूनच गेली होती. त्यापैकी कर्नाटकात काँग्रेसने आज बाजी मारली आहे.

आता दक्षिणेतील तेलंगाणा, त्यानंतर मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथे २०२४च्या जानेवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. तेलंगाणामध्ये के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) सरकार आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. येथे काँग्रेस फोडून भाजपने कोविडकाळात सत्ता स्थापन केली होती. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्ता राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान असणार आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि छत्तीसगडध्ये भुपेश बघेल (Bhupesh Baghel) यांचे सरकार आहे. तर जम्मू -काश्मीरमध्येही याचवर्षाच्या शेवटापर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला कर्नाटकमध्ये मिळालेला विजय आगामी विधानसभा निवडणुकीत मिळणार का, त्यासाठी काँग्रेसची रणनीती काय राहाणार आहे, हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -