आता पुरुषही होऊ शकतात गरोदर; चीनच्या वैज्ञानिकांचा अजब दावा

male pregnancy in china weird experiment
आता पुरुषही होऊ शकतात गरोदर; चीनच्या वैज्ञानिकांचा अजब दावा

आतापर्यंत आपण फक्त महिला गर्भवती होत असल्याचे ऐकले होते आणि पाहिले होते, परंतु आता पुरुषही गरोदर राहू शकतात. हे ऐकूण तुम्ही हैराण झाला असालं, पण हे खरं आहे. यासंदर्भातला दावा चीनने केला आहे. चीन नेहमी अजीब रिसर्च करत असतो. असाच एक रिसर्च करून चीनने पुरुष गरोदर राहू शकतात असा दावा केला आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी नर उंदारात गर्भाशय टाकून मुलांना जन्म दिला. याच आधारे चीनच्या वैज्ञानिकांनी पुरुषांना गरोदर करण्याचा चमत्कार करून दाखवला आहे. यासाठी बऱ्याच वर्षांपासून रिचर्स सुरू होता. आता या रिसर्चचा अहवाल समोर आला आहे.

यापूर्वी चीनच्या वुहान लॅबमधून बाहेर पडलेल्या वैज्ञानिकाने दावा केला होता की, चीन अजीब रिसर्च करत असतो. अनेक असे रिसर्च केले आहेत, जे इतर देशांमध्ये बॅन झाले आहेत.

चीनच्या वैज्ञानिकांनी केलेल्या या रिसर्चमध्ये नर उंदिराच्या शरीरावर एक्सपेरिमेंट केला. यात नर शरीरात सर्जरी करून मादीच्या शरीरातील गर्भाशय टाकण्यात आले. यानंतर नराला गरोदर करून सिझेरियनच्या माध्यमातून मुलाला जन्म दिला. या रिसर्चनंतर भविष्यात पुरुष गरोदर राहण्याची शक्यता वाढली आहे. इंफोवार्सच्या रिपोर्टनुसार, या रिसर्चनंतर आता ट्रांसजेंडर जे मुलांना जन्म देऊ इच्छितात, तर त्यांना याची मदत होईल.

असा झाला रिसर्च

शांघाईच्या नेवल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये हा रिसर्च झाला. यामध्ये वैज्ञानिकांनी मादी उंदाराच्या शरीरातून गर्भाशय काढले. त्यानंतर ते नर उंदाराच्या शरीरात टाकले. मग यूट्रस ट्रान्सप्लांटनंतर नर उंदिर गरोदर राहिला आणि सिझेरियनद्वारे त्याची डिलिव्हरी करण्यात आली. हे रिसर्च चार टप्प्यात केले गेले. हे रॅट मॉडेल असल्याचे सांगितले गेले आहे. आता याचा सक्सेस रेट मात्र ३.६८ टक्के सांगितला गेला आहे. दरम्यान नर उंदिरावरील रिसर्च यशस्वी ठरला असून १० मुलांना जन्म दिला. चीन वैज्ञानिकांनी आता रॅट मॉडेलची अंमलबजावणी मनुष्यावर करण्याच्या प्रयत्नात आहे. नराला गरोदर केल्याचे पहिल्यांदाच घडले आहे.