घरदेश-विदेशशत्रुत्वाची भावना समाप्त करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

शत्रुत्वाची भावना समाप्त करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

"दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करुन टाका" असा संदेश पंतप्रधानांनी दिला.

दिवाळीच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी अयोध्या प्रकरणावरसुद्धा भाष्य केले. दिवाळीच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करुन टाका” असा संदेश पंतप्रधानांनी दिला.

काय म्हणाले पंतप्रधान?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मधून देशवासीयांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी या देशातील लोक नेहमी प्रयत्नशील असतात.” यासाठी त्यांनी राम मंदिर प्रकरणाची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, “२०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावेळी देशातील एकता आणि अखंडता पहायला मिळाली. त्यावेळी काही समाजकंटकांनी स्वतःच्या हितासाठी दोन धर्मात तेढ निर्माण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशात झालेला सकारात्मक बदल सर्वांनी पाहिला. त्यावेळी देशात आनंदाचे वातावरण होते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -