Manipur Violence : कालच मुख्यमंत्री म्हणाले, शांतता आहे; आज मणिपूर पुन्हा पेटले

संग्रहित छायाचित्र

 

इम्फाळः मणिपूरमध्ये आता शातंता आहे, असा दावा मुख्यमंत्री नोंगथोंबाम बीरेन सिंह यांनी रविवारी केला आणि सोमवारी दुपारी पुन्हा मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. येथील इम्फाळ पूर्वेला दोन समुदायांमध्ये वाद झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी रिकाम्या घरांची तोडफोड केली. घरांना आग लावली. छावणीत झोपलेल्या नागरिकांवर हल्ला केला.

इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. येथील न्यू चेकोन भागात मेईतेई आणि कुकी समुदायांमद्ये सोमवारी दुपारी वाद झाला. स्थानिक बाजारपेठेत जागेवरुन हा वाद झाला. वाद चिघळल्याने येथे लष्कर आणि निमलष्कर दल तैनात करण्यात आले आहे. या परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. कुकी ग्रामस्थांना राखीव वनजमिनीतून बेदखल करण्यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे याआधीही अनेक चकमकी झाल्या. येथील ६४ टक्के लोकसंख्या मेईतेई समुदायाची आहे. राज्याच्या १० टक्के क्षेत्रावर त्यांचा कब्जा आहे. अधिसूचित डोंगराळ भागात बिगर आदिवासींना जमीन खरेदी करण्याची परवानगी नाही. त्यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश केल्यास ते डोंगराळ भागात जमीन खरेदी करू शकतील. त्यामुळे आदिवासींमध्ये नाराजी आहे.

हा वाद इतका पेटला की तेथे हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात काही नागरिकांचा बळी गेला आहे. त्यानंतर कुकी समाजाच्या दहा आमदारांनी मुख्यमंत्री सिंह यांची भेट घेतली. आम्ही मणिपूरपासून वेगळे होणार नाही. आम्हाला देश सोडून जायाचे नाही. पण आम्ही आमची सिमारेषा आखून घेतो. आम्हाला स्वतंत्र प्रशान हवे आहे. आम्ही स्वतः आमचा कारभार करु, असे या दहा आमदारांनी मुख्यमंत्री सिंह यांना सांगितले आहे. विशेष म्हणजे या दहा आमदारांतील सात आमदार हे भाजपचे आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचार करणारे दिसताच क्षणी गोळ्या घाला, असे आदेश केंद्रीय गृहमत्री अमित शाह यांनी पोलिसांना दिले होते. मात्र आता त्यांच्या पक्षाचे आमदार कुकी समाजाला स्वतंत्र मिळावे, अशी मागणी करत आहेत. ही मागणी मान्य होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.