घरमहाराष्ट्रगेम खेळायला मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या

गेम खेळायला मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या

Subscribe

अभ्यास न करता गेम खेळत बसल्यामुळे दर्शनला त्याच्या आईने ओरडा दिला. हा राग सहन न झाल्याने दर्शन आपल्या रुममधअये जाऊन कमरेच्या पट्ट्याने गळफास लावला.

पुण्यामध्ये शुल्लक कारणावरुन एका १३ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. गेम खेळायला मोबाईल दिला नाही त्यामुळे राग आलेल्या दर्शन भुतडा या मुलाने आत्महत्या केली आहे. ३१ डिसेंबरला संध्याकाळी दर्शनने कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून आत्महत्या केली. धनकवडीच्या गणेशनगर भागामध्ये ही घटना घडली आहे. शुल्लक कारणावरुन दर्शनने उचलेल्या टोकाच्या पावलामुळे भुतडा कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


हेही वाचा – आईचा मोबाईलला नकार; मुलाची आत्महत्या

- Advertisement -

गेमसाठी आत्महत्या 

१३ वर्षाचा दर्शन ८ वी मध्ये शिकत होता. मात्र त्याला सतत मोबाईलवर गेम खेळण्याची सवयी होती. या गेम्समुळे तो अभ्यास करायचा नाही. ही सवयी दूर करण्यासाठी त्याच्या आई – वडीलांनी त्याला मोबाईल देणे बंद केले होते. ३१ डिसेंबरला सर्वांना सुट्टी होती. दर्शन घरी होता सुट्टी असल्याने तो गेम खेळत बसला होता. अभ्यास न करता गेम खेळत बसल्यामुळे दर्शनला त्याच्या आईने ओरडा दिला. हा राग सहन न झाल्याने दर्शन आपल्या रुममधअये जाऊन कमरेच्या पट्ट्याने गळफास लावला.

पोलीस तपास सुरु 

दर्शन चिडून गेला आणि त्याच्या रुममधून काहीच आवाज न आल्यामुळे त्याच्या आईने त्याच्या रुममध्ये जाऊन पाहिले. त्यावेळी दर्शनने पट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. दर्शनचे वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत तर आई बँकेचे कलेक्शन करते. दरम्यान याप्रकरणाचा तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -