घरदेश-विदेशपुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अझहर आणि रौफ अझहर एनआयएने दाखल केले...

पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अझहर आणि रौफ अझहर एनआयएने दाखल केले आरोपपत्र

Subscribe

काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आणि रौफ अझहर असून सीआरपीएफच्या ताफ्यामधील बसवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे पाकिस्तानमधून आणण्यात आले होते, असे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते.

एनआयएने या हल्ल्याबाबत ५ हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. हे आरोपपत्र मंगळवारी कोर्टात सादर करण्यात आले. आरडीएक्ससह अन्य स्फोटके दहशतवादी पाठीवर लादून घेऊन आले होते. तसेच या प्रकरणातील एक अन्य आरोपी असलेला इक्बाल रादर हा उमर फारुख या दहशतवाद्याला रात्रीच्या अंधारामध्ये नियंत्रण रेषा पार करवून काश्मीर खोर्‍यात घेऊन आला होता. एनआयएला या संदर्भातील व्हिडिओ पुरावे मिळाले आहेत. त्यामध्ये अमावस्येच्या रात्री घुसखोरी करण्याच्या कारस्थानाचा उल्लेख आहे. हा व्हिडिओ एनआयएला उमर फारुखच्या मोबाइलमध्ये मिळाला होता.

- Advertisement -

या फोनमधील माहितीवरून तपास यंत्रणेला दहशतवाद्यांच्या कारस्थानाची माहिती मिळाली आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले अमोनियम नायट्रेड आणि नायट्रो ग्लिसरिन यासारखे पदार्थ स्थानिक पातळीवर गोळा केले होते. दरम्यान, यातील काही स्फोटके ही दहशतवाद्यांनी काश्मीरमधून ऑनलाइन खरेदी केली होती, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -