घरताज्या घडामोडीलखनऊमधील भीषण आगीत दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री योगींचे चौकशीचे आदेश

लखनऊमधील भीषण आगीत दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री योगींचे चौकशीचे आदेश

Subscribe

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हजरतगंज भागातील एका हॉटेलला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. लिवाना हॉटेलमध्ये आग लागली असून, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. धुरामुळे अनेकजण या हॉटेलच्या खोल्यांमध्ये अडकले आहेत.

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हजरतगंज भागातील एका हॉटेलला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. लिवाना हॉटेलमध्ये आग लागली असून, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. धुरामुळे अनेकजण या हॉटेलच्या खोल्यांमध्ये अडकले आहेत. धुरामुळे अनेक जण बेशुद्ध झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या आगीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभागीय आयुक्त आणि पोलिस आयुक्तांच्या संयुक्त समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत. (massive fire broke out in a hotel in lucknow hazratganj)

राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही जखमींची काळजी घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल गाठले आणि या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही, असे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, हजरतगंजच्या सुल्तानगंज भागात असलेल्या लिवाना हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत जखमी झालेल्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 20 हून अधिक लोकांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले आहे.

- Advertisement -

धुरात गुदमरल्याने अनेक जण बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 15 वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. तिसऱ्या मजल्यावरील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी सहा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सध्यस्थितीत सुरक्षेच्या कारणात्सव येथील रस्ता बंद करण्यात आला आहे.

आग विझवण्यासाठी बुलडोझरचा वापर करत भिंत तोडण्यात आली. जिल्हा दंडाधिकारी सूर्यपाल गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये एकूण 30 खोल्या आहेत, त्यापैकी 18 खोल्यांमध्ये लोक होते. खोल्यांमध्ये 30 ते 35 लोक उपस्थित होते. पहिल्या मजल्यावर बँक्वेट हॉल आहे. इथे बरेच लोक होते. अनेक जण सकाळी हॉटेलमधून बाहेर पडले होते.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊच्या हजरतगंज येथील हॉटेल लिवाना येथे लागलेल्या आगीच्या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा अधिकार्‍यांना जळलेल्या लोकांवर योग्य उपचार व्हावेत तसेच घटनास्थळी पोहोचून बचाव कार्याला गती देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींची काळजी घेतली.

लखनौचे आयुक्त एसबी शिरोडकर यांनी सांगितले की, हॉटेल व्यवस्थापनाच्या नोंदीनुसार तेथे ३८ ते ४० लोक थांबले होते, त्यापैकी १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सात जण अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये धुराचे लोट असल्याने किती लोक अजूनही आत अडकले आहेत. ही माहिती उपलब्ध नाही. पोलिस आयुक्त आणि मंडला आयुक्तांना तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशीनंतर कारवाई केली जाईल.


हेही वाचा – कॅनडात अज्ञातांच्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -