घरताज्या घडामोडीसंजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीनं कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीनं कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. (Judicial Custody Increase Till 19 September of Shiv sena Sanjay Raut)

न्यायालयीन कोठडीत वाढ केल्याने संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्कामात आणखीन वाढ झाली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली. तसेच, राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचे या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झाले होते. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने 9 विकास कामांना 901 कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने 138 कोटी रूपये जमा केले होते.

- Advertisement -

म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत 1039.79 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील 100 कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे.

ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील 55 लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.


हेही वाचा – ही आहे खरी मोठ्ठया नेत्यांची अडचण… समजून घ्या, चित्रा वाघांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -