घरदेश-विदेशमायावती मध्यप्रदेशातील काँग्रेसचा पाठिंबा काढणार?

मायावती मध्यप्रदेशातील काँग्रेसचा पाठिंबा काढणार?

Subscribe

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिलेला पाठिंबा काढण्याचा इशारा मायावती यांनी काँग्रेसला दिला आहे.

बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी थेट काँग्रेसला राजस्थान आणि मध्यप्रदेशातील पाठिंबा काढण्याचा इशारा दिला आहे. २ एप्रिल रोजी झालेल्या भारत बंददरम्यान निष्पाप व्यक्तींविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या. अन्यथा पाठिंबा काढू असा थेट इशारा मायावती यांनी काँग्रेसला दिला आहे. २ मे रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तत्कालीन भाजप सरकारने निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, दाखल केलेले गुन्हे हे राजकीय हेतूनं आणि जातीचा विचार करून दाखल केल्याचा आरोप बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. आता काँग्रेसची सत्ता असून काँग्रेसनं हे गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा दिलेल्या पाठिंब्याबाबत विचार करावा लागेल असा सरळ इशारा मायावती यांनी दिला आहे. २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत बसपाचे २ तर, २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत भाजपचे सहा आमदार आहेत.

पाच राज्यामध्ये भाजपला धुळ चारत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या. पण, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला जादुई आकडा गाठता आला नाही. अखेर, बसपा आणि सपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसनं सत्ता स्थापन केली. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसनं भाजपच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -