Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश hanta virus : सावधान! अमेरिकेत आता हंता व्हायरसची एंट्री, घर साफ करणाऱ्या...

hanta virus : सावधान! अमेरिकेत आता हंता व्हायरसची एंट्री, घर साफ करणाऱ्या महिलेला झाला संसर्ग

Related Story

- Advertisement -

अमेरिकेत सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत नाही तोवर सर्वात मोठे नवे आव्हान उभे येऊन ठाकले आहे. अमेरिकेमधील मिशिगन शहरात सोमवारी हंता व्हायरसची पहिली घटना समोर आली आहे. या शहारातील एका महिलेमध्ये हंता व्हायरसची लक्षणे आढळली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्हायरसच्या एंट्रीमुळे अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

घर साफ करणाऱ्या महिलेला झाला पहिला संसर्ग 

स्थानिक आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या महिलेला गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे प्रकरण मिशिगन राज्यातील वॉशिंग्टन काउंटीमध्ये उघडकीस आले आहे. असे सांगितले जात आहे की, ही महिला जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेल्या रिकाम्या घराची साफसफाई करत होती. त्याचवेळी ती काही उंदीरांच्या संपर्कात आली, त्यानंतर तिला शरीरात हंता व्हायरसची लक्षणे दिसू लागली. हंता विषाणू किंवा व्हायरस उंदीरांद्वारे मानवामध्ये पसरतोय. उंदारांची लाळ, मूत्र आणि विष्ठेतून या विषाणूचा प्रसार होत असून जेव्हा एखादा व्यक्ती या उंदरांच्या संपर्कात येतो तेव्हा हंता व्हायरस मानवाच्या शरीरात शिरकाव करतो.

अमेरिकेत १९९३ सालापासून हंता व्हायरसवर संशोधन सुरू

- Advertisement -

अमेरिकेतील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अमेरिकेत १९९३ सालापासून हंता व्हायरसवर संशोधन सुरू आहे. अनेक नागरिक या हंता व्हायरसच्या संपर्कात आलेल्याने बाधित झाले आहेत. परंतु कोरोना काळात अमेरिकेतले हंता व्हायरसचे हे पहिलेच प्रकरण आहे. कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगाला या व्हायरसने वेठीस धरले. दरम्यान चीनमध्ये काही काळानंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाला, परंतु त्यानंतर चीनमध्येही हंता व्हायरसचा प्रसार होऊ लागला. या व्हायरसमुळे चीनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे.

हंता व्हायरस नेमका पसरतो कसा?  लक्षणे?

आत्तापर्यंत झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की, हंता व्हायरस मनुष्यातून मनुष्यात पसरत नाही. एखादा व्यक्ती जेव्हा उंदीर किंवा खारु ताईच्या संपर्कात येतो तेव्हा त्यास हंता व्हायरसची लागण होण्याची शक्यात आहे. हंता व्हायरसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे ४० असून ही खूप भयानक बाब आहे. या हंता व्हायरसची लक्षणे कोरोनासारखीच आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी उंदीराच्या संपर्कात येते, तेव्हा त्या व्यक्तीस ताप, थंडी, शरीरदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे स्वत;मध्ये जाणवू लागतात. या व्यतिरिक्त उलट्या किंवा मळमळ हे देखील त्याची लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये, श्वास घेण्यात अडचण येऊ शकते.


केंद्राचा अन्यायकारक भाडेकरु कायदा आम्हाला लागू होत नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण


- Advertisement -

 

- Advertisement -