घरदेश-विदेशभारताची mRNA लस जिंकणार ओमिक्रॉन विरोधातील युद्ध? सरकार लवकरच निर्णय घेणार

भारताची mRNA लस जिंकणार ओमिक्रॉन विरोधातील युद्ध? सरकार लवकरच निर्णय घेणार

Subscribe

कमिटीने पहिल्या चाचणीच्या परीक्षणात वॅक्सीन  HGCO19 सुरक्षित आणि इम्युनोजेनिक असल्याचे निष्कर्ष काढले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे. 

देशातील पहिल्या मेसेंजर mRNA लसीची मानवांवरील चाचण्या लवकरचं सुरू होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये या चाचण्या सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जातेय. पुणेस्थित जेनोवा बायोफार्मास्युटिकल्सने mRNA लसीचे फेज 2 मधील डेटा सादर केला असून फेज 3 च्या डेटा देखील पूर्ण केला आहे.अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (DCGI) तज्ञ समिती (SEC) लवकरच या डेटाचा सविस्तर अभ्यास करेल. जेनोवा बायोफार्मास्युटिकल्सने ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात mRNA लस विकसित केली आहे, जी लवकरच मानवांवरील  परिणामकारकता आणि रोगप्रतिकारक शक्ती ओळखण्यासाठी वापरली जाईल अशी माहिती समोर येतेय.

लसीचे नाव काय आहे

सप्टेंबर 2021 च्या सुरुवातीला, जेनोवाने लसीच्या चाचण्या अद्ययावत करण्यासाठी एक प्रेस स्टेटमेंट जारी केले. ज्यात त्यांनी म्हटले होते की, “भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने ऑगस्टमध्ये जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडद्वारे विकसित केलेल्या भारतातील पहिल्या HGCO19 आधारित कोरोनाविरोधी mRNA लसीच्या साठी फेज II आणि फेज III अभ्यास नियमांना मंजुरी दिली आहे. तसेच जेनोवाने पहिल्या टप्प्यातील अभ्यासाचा अंतरिम डेटा भारत सरकारच्या क्लिनिकल डेटा नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटी (NRA)च्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडे सादर केला आहे.

- Advertisement -

कोरोनावर प्रभावी सिद्ध होऊ शकते ही लस

जेनोवाने पहिल्या टप्प्यातील अभ्यासाचा अंतरिम क्लिनिकल डेटा भारत सरकारच्या राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाला (NRA) म्हणजेच सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडे सादर केला. लस विषय तज्ञ समितीने (SEC) अंतरिम टप्प्यातील डेटाचे पुनरावलोकन केले. यात कमिटीने पहिल्या चाचणीच्या परीक्षणात वॅक्सीन  HGCO19 सुरक्षित आणि इम्युनोजेनिक असल्याचे निष्कर्ष काढले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे.

चाचण्या कुठे चालू आहेत?

कंपनीने लसीच्या ट्रायल साइट्सची संख्या देखील नमूद केली आहे, त्यात म्हटले आहे की, HGCO19 एमआरएनए आधारित या कोविड 19 वॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी जवळपास  10-15 ठिकाणी केली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 22-27 जागांवर केली जाणार आहे.  जेनोवा या अभ्यासासाठी नेटवर्क साइट्ससाठी DBT-ICMR क्लिनिकल चाचणीचा उपयोग करत आहे.mRNA लस न्यूक्लिक अॅसिड लसींच्या श्रेणीतील आहेत. यामध्ये, रोग निर्माण करणाऱ्या व्हायरस किंवा रोगजनकांच्या अनुवांशिक सामग्रीचा वापर केला जातो. ज्याद्वारे शरीरातील विषाणूंविरूद्ध रोगप्रतिकारक प्रतिक्रिया सक्रिय केली जाऊ शकते. सर्व लस शरीरात अश्याप्रकारे भिणवली जाते ज्यामुळे संसर्गास कारणीभूत ठरणारे विषाणू ओळखले जातील आणि भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही विषाणूच्या हल्ल्याविरूद्ध अँटीबॉडीज बनवता येतील.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -