घरदेश-विदेशभारताच्या मदतीला Microsoft CEO सत्या नाडेला सरसावले; ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स पुरवणार

भारताच्या मदतीला Microsoft CEO सत्या नाडेला सरसावले; ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स पुरवणार

Subscribe

भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार धक्का बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवली आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहून मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांना दु:ख झालं असून ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. भारताला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स पुरवणार असल्याचं सत्या नाडेला यांनी सांगितलं.

सत्या नाडेला यांनी ट्विट करत भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना कोरोनाची परिस्थिती पाहून हतबल झालो असल्याचं त्यांनी म्हटलं. “सध्याची भारताची स्थिती पाहून मी फार दु: खी आहे. अमेरिकेचे सरकार मदत करतंय याबद्दल मी आभारी आहे. मायक्रोसॉफ्ट मदतीसाठी त्यांच्या संसाधनांचा, टेक्नोलॉजीची वापर करेल. तसंच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स पुरवेल,” असं ट्विट नाडेला यांनी केलं आहे.

- Advertisement -

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांच्यासह गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई देखील भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून १३५ कोटींचा निधी पुरवाल जाईल, अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरविली जाईल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -