Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश StayStrongIndia : UAE च्या Burj Khalifa वर झळकला तिरंगा, भारताला दिले कोरोनाविरोधी...

StayStrongIndia : UAE च्या Burj Khalifa वर झळकला तिरंगा, भारताला दिले कोरोनाविरोधी लढाईचे बळ

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी संयुक्त अरब अमिरात देश भारताच्या खांद्याला खांदा देऊन उभा आहे. कोरोनाच्या संकट काळात संयुक्त अरब अमिरात देशाने जगातील सर्वात मोठ्या बुर्ज खलिफा इमारतीवर भारतीय तिरंगा झळकावत भारतीयांना कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचे बळ दिले. भारतात कोरोनाची स्थिती दिवसागणिक चिंताजनक होत आहे. यातच सौदी अरेबिया, युके, अमेरिकासह अनेक देश मदतीसाठी भारताच्या पाठीशी उभे आहेत. याचदरम्य़ान UAE देशाने भारताप्रति समर्थन आणि प्रेम दर्शवण्यासाठी बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) भारतीय तिरंग्याची विद्युत रोशनाई केली होती. या तिरंगी रोशनाईसह #StayStrongIndia असा मेसेजही झळकवण्यात आला होता.

- Advertisement -

रविवारी मध्यरात्री UAE मधील भारतीय दूतवासाने या भव्य रोशनाईचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओसह भारतीय दूतवासाने लिहिले होते की, भारत कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहे. यातच भारताचा मित्र देश UAEने शुभेच्छा देत भारत लवकर कोरोनास्थितीतून बाहेर येत सर्व काही ठीक होईल असे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता बुर्ज खलिफा ही भव्य इमातर तिरंगी रंगाच्या रोशनाईने झगमगत आहे. यात मधून #StayStrongIndia चा सकारात्मकर मेसेज भारतीयांना देण्यात आला आहे.

भारतात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. लस तयार करण्यासाठी अमेरिकेकडून कच्चा माल पुरवला जात होता. मात्र काही दिवसांपासून अमेरिकेने कोरोना लसीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अमेरिकेने नरमाईची भूमिका घेत निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे भारताला मोठी मदत होणार आहे.

- Advertisement -

#StaystrongIndia: Burj Khalifa lights up with tricolour to showcase support amid Covid-19 crisis
StayStrongIndia : UAE च्या Burj Khalifa वर झळकला तिरंगा, भारताला दिले कोरोनाविरोधी लढाईचे बळ

रविवारी अमेरिकेने जाहीर केले की, भारतात कोरोना लस तयार करण्यासाठी लागणार आवश्यक कच्चा माल सुरळीत पाठवला जाणार आहे. तसेच देशातील फ्रंटलाईन्स वर्कसच्या कोरोना टेस्ट करण्यासाठी अमेरिकेकडून रॅपिड डाइगोनॅस्टिक टेस्ट किट, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किटची मदत उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

तसेच ब्रिटन देशानेही भारताला कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ब्रिटनने भारताला ६०० इक्विपमेंट्स पाठवण्याची घोषणा केली आहे. ज्य़ामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. दरम्यान व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन कंसेंट्रेटर्स घेऊन येणारी पहिली खेप युकेहून भारतात रवाना झाली असून मंगळवारी भारतात पोहचणार आहे.


 

- Advertisement -