घरदेश-विदेश३१ डिसेंबरला दारू पडली कमी, त्यांनी 'पब' पेटवला

३१ डिसेंबरला दारू पडली कमी, त्यांनी ‘पब’ पेटवला

Subscribe

३१ डिसेंबरच्या रात्री दारू कमी पडली म्हणून जमावानं कार्यक्रमस्थळी गोंधळ घालत सामान पेटवून दिली.

३१ डिसेंबर म्हटलं की फुल टू एन्जॉय!! दारू पिऊन नुसता धिंगाणा. बरेच जण आपल्याला याच अवस्थेमध्ये आणि वेगळ्याच मुडमध्ये दिसून येतात. ३१ डिसेंबरच्या रात्री तर तळीरामांची दिवाळी असते. त्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज असते. पण, हैद्राबादमध्ये मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री वेगळंच प्रकरण घडलं. दारू कमी पडली म्हणून चक्क पब पेटवला गेला आहे. मधापूरमध्ये भडकलेल्या जमावानं चक्क पब पेटवून दिला. त्यामुळे पोलिसांची धावपळ झाली. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये ३ आयोजकांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजकांना १००० लोकांना प्रेवश देण्यास मुभा होती. पण, प्रत्यक्षात मात्र ३००० जणांना प्रवेश दिला गेला होता. यु मीडिया आणि एस मीडिया एन्टरटेनमेंटनं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये ५००, १५०० आणि २५०० असा तिकीट दर देखील ठेवण्यात आला होता. यामध्ये २५०० तिकीट दर असलेल्यांसाठी हवं तेवढं जेवण आणि दारू असा नियम होता. पण, प्रत्यक्षात मात्र दारू कमी पडली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावानं घटनास्थळी गोंधळ घालत दारू हवी अशी मागणी करत सामान पेटवून दिलं.

वाचा – तब्बल २ हजारांहून अधिक तळीरामांवर कारवाई झाली!

यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवलं. शिवाय, सहा जणांना ताब्यात देखील घेतलं. ज्यामध्ये ३ आयोजकांचा देखील समावेश आहे. दरम्यान, आयोजकांविरोधात कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलिसांनी आखून दिलेले नियम धाब्यावर बसवल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. पण, दारू कमी पडल्यानं नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमाला मात्र गालबोट लागले. त्याचीच चर्चा सध्या हैद्राबादमध्ये जोरात सुरू आहे.

वाचा – तळीरामांनो, दारू पिण्यापूर्वी ही बातमी वाचा!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -