प्रसारमाध्यमांशी १५ ऑगस्टपर्यंत जास्त बोलू नका, पहील्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी टोचले मंत्र्याचे कान

मंत्रिमंडळाचा आणि खात्याबाबतचं कामकाज समजून घेण्यासाठी मंत्र्यांनी १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीत थांबून काम करावे.

Modi's advice in the first cabinet meeting Don't talk too much with media till August 15
प्रसारमाध्यमांशी १५ ऑगस्टपर्यंत जास्त बोलू नका, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून युवा मंत्रिमंडळ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण ४३ मंत्र्यांना बुधवारी राष्ट्रपती भवन येथे शपथविधी दिली असून मंत्र्यांनी आपला पदभार स्विकारला आहे. गुरुवारी पहिलीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक मोदींनी आयोजित केली असून या बैठकीत नव्या मंत्र्यांना मोदींनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत माध्यमांशी जास्त बोलू नका असा सल्ला दिला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सर्व मंत्र्यांना आपल्या कामाबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचाही सल्ला दिला आहे.

नव्या केंद्रीय मंत्र्यांच्या शपथविधीनंतर उशीरा रात्री त्यांच्या खात्यांची घोषणा करण्यात आली यानंतर प्रत्येकाने आपले खात्याचा पदभार स्विकारला आहे. एकूण ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली असून यातील ३६ मंत्र्यांचा नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पंतप्रतधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केली आहे. या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित होते तर काही अधिकारीही व्हिसीच्या माध्यमातून जोडले गेले होते. या बैठक दरम्यान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना संबोधले आहे.

नव्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना काही सूचना केल्या आहेत. मंत्रिमंडळाचा आणि खात्याबाबतचं कामकाज समजून घेण्यासाठी मंत्र्यांनी १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीत थांबून काम करावे. तसेच कामकाज समजल्यावर त्वरित आपल्या मंत्रालयाचं कामकाज सुरु करा अशा सुचना मोदींनी मंत्र्यांना दिल्या आहेत. तसेच १५ ऑगस्टपर्यंत प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असा सल्लाही मोदींनी दिला आहे.

मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये ३६ नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये १५ कॅबिनेट मंत्री आहेत व २८ राज्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मोदी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर आगीम रणनीतिवर नव्या मंत्र्यांसह चर्चा करण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी ५ ते ७ दरम्यान ही बैठक पार पडणार आहे. प्रथम मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल आणि त्यानंतर सात वाजता मंत्रीपरिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री सहभार घेणार आहेत.