घरदेश-विदेशमोदींनी घेतला देशातील सर्वात महागडा घटस्फोट

मोदींनी घेतला देशातील सर्वात महागडा घटस्फोट

Subscribe

देशातील आघाडीची औषध निर्माता कंपनी कॅडिला फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष सह-व्यवस्थापकीय संचालक राजीव मोदी यांच्या घटस्फोटाबाबत सध्या बोलले जात आहे.

सध्या देशात एका घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. आत्तापर्यंतच्या सर्वात महागड्या ठरलेल्या घटस्फोटांपैंकी हे एक प्रकरण म्हणून चर्चेत राहिले आहे. देशातील आघाडीची औषध निर्माता कंपनी कॅडिला फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष सह-व्यवस्थापकीय संचालक राजीव मोदी यांच्या घटस्फोटाबाबत सध्या बोलले जात आहे. हा सर्वाधीक महागडा घटस्फोट ठरल्याच म्हटलं जात आहे. मुंबईच्या गरवारे पोलिएस्टर लिमिटेडच्या मालकांची मुलगी मोनिका गरवारे आणि राजीव मोदी यांच्या घटस्फोटाचा अर्ज अहमदाबादच्या कौटुंबिक न्यायालयानं मान्य केला आहे. राजीव-मोनिका या दाम्पत्याला १७ वर्षांचा एक मुलगाही आहे.

वैवाहीक जीवन संपुष्टात

गेल्या २६ वर्षांपासून राजीव आणि मोनिका यांचं वैवाहिक जीवन शांततेनं सुरू होतं. आता मात्र त्यांचं नातं दुरावल आहे. दोघांनी परस्पर संमतीनं हा वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू त्यांनी दिलेल्या पोटगीच्या रकमेमुळे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. राजीव – मोनिका यांचा १९९२ साली विवाह झाला होता. ३० ऑगस्ट रोजी मोनिकानं आपल्या पतीवर प्रतारणा आणि मारहाणीचा आरोप केला होता. मोनिकानं याची तक्रार पोलिसांतही नोंदवली होती.

- Advertisement -

तब्बल २०० कोटी पोटगी

या घटनेनंतर त्यांच्या नात्यात कटुता आली. त्यांनतर दोघांनी परस्पर संमतीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला. या घटस्फोटासाठी राजीव मोनिकाला २०० कोटी रुपये पोटगीपोटी देणार आहेत. तर मुलाची जबाबदारी वडिलांकडे राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -