घरताज्या घडामोडीRSS ची मोठी बैठक, देशभरातील पदाधिकारी आगामी निवडणुकांवर रणनिती आखणार?

RSS ची मोठी बैठक, देशभरातील पदाधिकारी आगामी निवडणुकांवर रणनिती आखणार?

Subscribe

धार्मिक मुद्यांच्या आधारावर फुट पाडण्याचा प्रयत्न - मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आगामी निवडणुका, देशातील राजकीय परिस्थिती आणि संघाचा प्रसार, प्रचार करण्यासाठीची रणनिती आखण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसंघाची बैठक नागपुरमध्ये आयोजित करण्यात आली असून ही बैठक २ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. देशातील अनेक विषयांवर आरएसएसच्या बैठकीत मंथन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. आगामी निवडणुक पाहता ही बैठक महत्त्वाची आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ६ दिवसीय बैठक ही राजकारणाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाहक दत्तात्रय होसबळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संघाच्या बैठकीत वर्षभराच्या कामाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बैठक घेतली होती. या बैठकीत देशभरात संघाचा प्रचार करण्यासाठी प्रचारकांची नियुक्ती केली होती. तर काही पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

धार्मिक मुद्यांच्या आधारावर फुट पाडण्याचा प्रयत्न

धार्मिक मुद्यांच्या आधारावर जगात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारत देश हा विवेधतेला स्वीकारणारा देश असून भारताला आता एक व्हायला पाहिजे आहे. असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भारताला एक व्हायचे आहे कारण जग एक आहे. एक होण्याचे अनेक प्रकार आहेत. जसे की, फिट असलेल्या ठेवायचं आणि अनफिट असलेल्या काढून टाकायचं परंतु आपला मार्ग नव्हे असे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भारत हा सर्व प्रकारच्या विविधतांना स्वीकारतो तसेच एखाद्या गोष्टीमध्ये फरक असेल तर तो न मिटवता एकत्र चालत राहतो असेही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : RSS वाले युपी निवडणुकीपूर्वी बड्या हिंदू नेत्याची हत्या करतील; टीकैत यांचं खळबळजनक वक्तव्य

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -