घरमुंबईठरलं! १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार?

ठरलं! १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार?

Subscribe

मुख्यमंत्री-राज्यपालांची भेट निश्चित !

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा आज सुटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल भगतशिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत रात्री साडेसात वाजता मुख्यमंत्री ठाकरे राज्यपालांची भेट घेणार असल्याचे समजले महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात आज चर्चा होणे अपेक्षित आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यानंकडून राजभवनाकडे राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. राजभवनाकडून वेळ देण्यात न आल्याचे मागील आठवड्यात राज्यपाल भेटीवरून राजकीय नाट्य रंगले होते. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालाच्या भेटी साठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून 1 सप्टेंबर भेटी साठी वेळ देण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत चर्चेचं निमंत्रण दिलं आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ नावांची यादी जाहीर करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यातशिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे व आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आदींच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -