घरCORONA UPDATEMonoclonal antibody: कॉकटेल अँटिबॉडीजने केली कमाल,१२ तासातच मिळाला रुग्णाला डिस्चार्ज

Monoclonal antibody: कॉकटेल अँटिबॉडीजने केली कमाल,१२ तासातच मिळाला रुग्णाला डिस्चार्ज

Subscribe

पहिल्या सात दिवसातच रुग्णांमधील लक्षणे कमी होऊन औषधांनाही उत्तम प्रतिसाद

देशात कोरोना विरोधीला लसीसाठी आणखी एक हत्यार समोर आले होते ते म्हणजे मोनोक्लोनल अँटिबॉडीज (Monoclonal antibody) या मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. या मोनोक्लोनल अँटिबॉडीजला दोन आठवड्यांपूर्वी भारतात मान्यता देण्यात आली. दोन आठवड्यातच या मोनोक्लोनल अँटिबॉडीजने कमाल केल्याचे पहायाला मिळत आहे. REGCov2 मोनोक्लोनल अँटिबॉडीज रुग्णाला दिल्यानंतर केवळ १२ तासाच रुग्णावर उपचार होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Monoclonal antibody: Cocktail antibodies successfully used, patient discharged within 12 hours in delhi ) दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालायाने याबाबतची माहिती दिली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीज रुग्णांवर यशस्वीरित्या काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सर गंगाराम रुग्णालयात एका ३६ वर्षांच्या आरोग्य कर्मचाऱ्याला ताप,अशक्तपणा,स्नायूंमध्ये वेदना जाणवत होत्या. कर्मचाऱ्याला कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्याला तात्काळ कासिरिविमॅब (casirivimab)  आणि इमदेविमॅब (Imdevimab)  या कॉकटेल असलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज देण्यात आल्या. त्यानंतर केवळ १२ तासातच रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याने रुग्णालयाने रुग्णास तात्काळ डिस्चार्ज दिला. अशाचप्रकारे दोन रुग्णांवर या मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा यशस्वी उपचार करण्यात आल्याचे गंगाराम रुग्णालयाने सांगितले. पहिल्या सात दिवसातच रुग्णांमधील लक्षणे कमी होऊन औषधांनाही उत्तम प्रतिसाद दिल्याचे रुग्णलयाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणजे कोरोनावर नियंत्रण मिळवणारे एक प्रकारचे कॉकटेल ड्रग आहे. जे कासिरिविमॅब आणि इमदेविमॅब यांच्या कॉकटेलपासून तयार करण्यात आली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीज रुग्णाला दिल्यानंतर त्याला कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होतो,असे सांगण्यात आले आहे.  भारतात सिप्ला आणि रॉश या दोन कंपनी मिळून मोनोक्लोनल अँटिबॉडीजची निर्मिती करत आहेत.


हेही वाचा – देशात Covid-19 Third Wave रोखण्यासाठी तातडीने ‘या ५’ रणनीती आखा; PHDCCIची सरकारला सूचना

- Advertisement -

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -