घरदेश-विदेशमोरबी पूल दुर्घटना; जयसुख पटेल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मोरबी पूल दुर्घटना; जयसुख पटेल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Subscribe

 

सुरतः मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपी जयसुख पटले यांची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. १ फेब्रुवारीला पटेल हे न्यायालयात शरण आले होते. त्यावेळी न्यायालयाने पटेल यांना पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष तपास पथकाने पटेल यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने पटेल यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

- Advertisement -

गेल्या महिन्यात विशेष तपास पथकाने या दुर्घटनेचे आरोपपत्र दाखल केले. या १२६२ पानी आरोपपत्रात पुलाचे संचालन करणाऱ्या जयसुख पटेल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अटक टाळण्यासाठी पटेल यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने पटेल यांचा अटकपू्र्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पटेल हे न्यायालयात शरण आले.

गेल्या वर्षी गुजरातमधील मोरबी भागातील मच्छू नदीत एक केबल पूल कोसळल्याची घटना घडली होती. यात १३५ जणांचा मृत्यू झाला. मोरबी पूल दुर्घटनेनंनतर तीन महिन्यांनी पोलिसांनी याचे आरोपपत्र दाखल केले. पोलीस उपअधीक्षक पी. एस. जाला यांनी मोरबी सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. मोरबी पुल दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपी पोलीस कोठडीत असून, दहावा आरोपी म्हणून ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर काँग्रेसने भाजपवर ओरेवाच्या मालकाला वाचवल्याचा आरोप केला होता.

- Advertisement -

याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. दीपक पारेख (ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक), दिनेशभाई महासुखराय दवे, मनसुख बलजीभाई टोपिया (तिकीट क्लर्क), कंत्राटदार प्रकाशभाई लालजीभाई परमार, ठेकेदार देवांगभाई प्रकाशभाई परमार, सुरक्षारक्षक अल्पेशभाई, दिलीपभाई आणि मुकेशभाई यांना अटक करण्यात आली आहे. गांधीनगरपासून ३०० किमी अंतरावर मच्छू नदीवर बांधलेला हा मोरबी पूल ७ महिन्यांपासून बंद होता. पुलाच्या दुरुस्तीचे काम अजिंठा मॅन्युफॅक्चरिंग (ओरेवा ग्रुप) यांना मिळाले. ही कंपनी घड्याळे, एलईडी दिवे, सीएफएल बल्ब, ई-बाईक बनवते. मात्र, आता अजिंठा मॅन्युफॅक्चरिंगने दुरुस्तीचे कंत्राट अन्य काही कंपनीला दिल्याचे समोर आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -