घरदेश-विदेशमाझ्यावरील कारवाईची सगळी माहिती ओम बिर्लांना दिली - नवनीत राणा

माझ्यावरील कारवाईची सगळी माहिती ओम बिर्लांना दिली – नवनीत राणा

Subscribe

मी बिर्ला यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. महिलांशी अशी वर्तवणूक दुर्दैवी आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक २३ मे रोजी बोलावण्यात आली आहे. यावेळी माझ्या जबाबाची नोंद होणार असून मी लेखी देखील देणार आहे.

लिलावती रुग्णालयातून रविवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा पती आमदार रवी राणा यांच्यासह सोमवारी नवी दिल्लीत दाखल झाल्या. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत माझ्यावरील कारवाईची सगळी माहिती मी त्यांना दिली आहे. अटकेत असताना मुंबई पोलिसांकडून हीन दर्जाची वागणूक मिळाली. तसेच अटकेपासून सुटका होईपर्यंत सर्व माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट झाल्यानंतर नवनीत राणा यांनी भेटीचा तपशील माध्यमांना दिला. नवनीत राणा म्हणाल्या की, लोकसभा अध्यक्षांनी जे घडले त्याच्याबद्दल सर्व माहिती विचारली. मी त्यांना अटकेपासून, लॉकअपपर्यंत आणि जेलपासून सुटकेपर्यंत पूर्ण माहिती दिली आहे. या भेटीत ज्यांची नावे द्यायची आहेत, त्यांची नावे दिली आहेत. मी बिर्ला यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. महिलांशी अशी वर्तवणूक दुर्दैवी आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक २३ मे रोजी बोलावण्यात आली आहे. यावेळी माझ्या जबाबाची नोंद होणार असून मी लेखी देखील देणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, जामीन देताना राणा दाम्पत्याला कोर्टाने माध्यमांशी न बोलण्याची अट घातली होती. मात्र तुरूगांतून बाहेर आल्यावर राणा दाम्पत्य माध्यमांशी बोलले. जामीन देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर वकील प्रदीप घरत यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला सोमवारी नोटीस पाठवली आहे. राणा दाम्पत्याला 18 मे पर्यंत बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पण नोटीस पाठवूनही नवनीत राणा आणि रवी राणा पुन्हा माध्यमांशी बोलले.

राणा दाम्पत्याने कोर्टाचा आदेश धुडकावत माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीला रवाना होण्याआधी दुपारी आपल्या निवासस्थानाबाहेर नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टिका केली. तसेच लिलावती रुग्णालयातून त्यांचे एमआरआयचे रिपोर्ट मागवणाऱ्या शिवसेना नेत्यांवरही टिका केली.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -