Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Terrorist : दहशतवाद्यांना मुंबईतून फंडिंग, तपासादरम्यान महत्त्वाची माहिती उघड

Terrorist : दहशतवाद्यांना मुंबईतून फंडिंग, तपासादरम्यान महत्त्वाची माहिती उघड

Related Story

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान संघटित सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांपैकी दोन दहशवाद्यांनी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेतले होते. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशी विविध ठिकाणी कारवाई करत दहशतवाद्यांना अटक केली आहे. मुंबईतील लोकल ट्रेनसह काही महत्त्वाची ठिकाणी तसेच दिल्ली आणि इतर राज्यांतील गर्दीच्या ठिकाणी घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता. या सहा दहशतवाद्यांमधील एक दहशतवादी हा मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत राहणाऱ्या समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सुरक्षा यंत्रणा आणखी अधिकच सतर्क झाल्या आहेत. यातच या दहशतवाद्यांना मुंबईतून पैशांची फंडिंग केली जात असल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्य़ान उघड झाली आहे.

 उत्तरप्रदेश निवडणुका होत्या टार्गेट 

त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. या दहशतवाद्यांचा उत्तरप्रदेशातील निवडणुका आणि मुंबईत घातपात करण्याच्या प्लॅन असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दहशतवाद्यांना मुंबईतून पैसा पुरवला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस या दहशतवाद्यांना फंडिंग करत होता.

दहशतवाद्यांना मुंबईतून आर्थिक फंडिंग,

- Advertisement -

सुत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना मुंबईतून आर्थिक फंडिंग केले जात होते. हा पैसा हवालामार्फत पुरवला गेला होता. यात मुंबईत राहणारा दहशतवादी जान मोहम्मद शेख हा हवाला रॅकेट पाहत होता आणि तो अंगडीयांच्या ( एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा जमा करणारा) संपर्कात होता. स्लिपर सेलला पैसे देणे ( गुप्त माहिती पोहचवणारा), दहशतावादी कृत्या करता लागणाऱ्या सामग्री करता पैसे देणे यासाठी या पैशांचा वापर केला जात होता. यामुळे मुंबई आणि दिल्ली येथील अंगडीया आता दहशतवाद विरोधी पथकाच्या टार्गेटवर आहेत.

डी गँग अंगडिया करत  होता अॅक्टिव्हेट 

सूत्रांच्या माहितीनुसार, दहशवादी कृत्यांकरिता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम उर्फ डी गँग अंगडिया अॅक्टिव्हेट करत होता. जान शेखच्या मार्फत या पैशांचे व्यवहार सुरु होते. या पैशांचा वापर करुन मुंबईतील गर्दीची ठिकाणं आणि व्हीआयपी ठिकाणांची माहिती गोळा करण्याकरता माणसं कामाला लावली होती. दिल्ली ते मस्कट विमानाने आणि मस्कट ते पाकिस्तान जहाजाने दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी नेण्याची सोय अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ अनिसने केली होती. आयएसआय आणि पाकिस्तान सैन्य दलाच्या सहकार्याने या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आली होती. तसेच दहशतावाद्यांनी दिल्ली ते पाकिस्तान आणि पाकिस्तान ते दिल्ली जाण्याची व्यवस्था केली होती.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेला खूप आधी दहशतवाद्यांचा सुगावा लागला होता. गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काम सुरू केलं आणि त्यांच्या तपासाला यश आलं. हे दहशतवादी सणांच्या काळात मोठा हल्ल्या करण्याच्या प्रयत्नात होते. या दहशतवाद्यांना अल कायदा, आयएसआयएस यासारख्या दहशतवादी संघटनांसह अंडरवर्ल्डची त्यांना साथ होती. आयएसआयएस त्यांना शस्त्रास्त्र देत होती. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आणि शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत.


दिल्लीतील दहशतवाद्याचे धारावी कनेक्शन, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीने महत्त्वाची बैठक


 

- Advertisement -