घरताज्या घडामोडीआनंद महिंद्रांकडून 100 वर्षीय मेजरचा व्हिडीओ शेअर; म्हणाले, 'पाहून अंगावर काटा आला'

आनंद महिंद्रांकडून 100 वर्षीय मेजरचा व्हिडीओ शेअर; म्हणाले, ‘पाहून अंगावर काटा आला’

Subscribe

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच ट्विटरवर सक्रिय असतात. प्रत्येक वेळी ते काहीतरी ट्विट करत असतात ज्याची बातमी बनते. शिवाय लोकही महिंद्रांची पोस्ट अनेकदा शेअर करतात. आनंद महिंद्रा नेहमी काहीतरी वेगळे आणि उत्साहवर्धक पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करत असतात.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच ट्विटरवर सक्रिय असतात. प्रत्येक वेळी ते काहीतरी ट्विट करत असतात ज्याची बातमी बनते. शिवाय लोकही महिंद्रांची पोस्ट अनेकदा शेअर करतात. आनंद महिंद्रा नेहमी काहीतरी वेगळे आणि उत्साहवर्धक पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. अशाच प्रकारचा नवा व्हिडीओ पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये माजी राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे ड्रिल प्रशिक्षक सब मेजर स्वामींना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे व्हीलचेअरवरून उठून सब मेजर स्वामींनी हा सन्मान स्विकारला. (national anand mahindra shared video of 100 year old sub major swami saluting indian army personnels)

आनंद महिंद्रा यांनी माजी राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे ड्रिल प्रशिक्षक सब मेजर स्वामींना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करताना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी प्रेरणास्थान म्हणून वर्णन केले आहे. तसेच, “सब मेजर स्वामी, राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी ड्रिल इन्स्ट्रक्टर यांचा 100 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला जात आहे. त्यांनी 7 भारतीय लष्करी सेनापतींना “सैन्य” तसेच आपल्या गुरूंचा आदर करण्याची भारतीय परंपरा सांगितली. जेव्हा त्यांनी सॅल्युट केला, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला”, असे त्यांनी लिहीले.

- Advertisement -

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि शेकडो लोकांनी तो पाहिला आहे. याशिवाय, महिंद्राच्या ट्विटला 30,000 हून अधिक लाईक्स आणि हजारो रिट्विट्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, आम्ही मेजर स्वामींना वयाच्या 100 व्या वर्षी केलेल्या सॅल्यूटसाठी सलाम करतो.


हेही वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निकाल?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -