घरक्राइममाजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निकाल?

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निकाल?

Subscribe

100 कोटी वसुली प्रकरणामुळे कोठडीत असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

100 कोटी वसुली प्रकरणामुळे कोठडीत असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणांसह, वाढते वय आणि आजार अशी कारणे देशमुख यांनी जामीन अर्जात दिली आहेत. (Anil Deshmukh Bail Application Extorsion Case Ed Mumbai High Court Today Mumbai)

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत. मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध तपास यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा केला आहे. तसेच, देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने ठेवला आहे.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण?

गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

- Advertisement -

याप्रकरणी सीबीआयने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये देशमुख व वाझे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.


हेही वाचा – अफगाणिस्तानात घातपाताची मालिका कायम; काबूलमध्ये शाळेत बॉम्बस्फोट, 53 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -