सांगलीच्या काजोल सरगरची खेलो इंडिया स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी

खेलो इंडिया (Khelo India)स्पर्धेत महाराष्ट्राच्या (Maharashtra) सांगलीमधील (Sangli) मुलीने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.

kajol sargar

खेलो इंडिया (Khelo India)स्पर्धेत महाराष्ट्राच्या (Maharashtra) सांगलीमधील (Sangli) मुलीने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. काजोल महादेव सरगर (Kajol Sargar) असे या सुवर्णपदक विजेत्या मुलीचे नाव असून वेटलिफ्टिंग (Weightlifting) खेळात ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. (khelo india kajol sargar won gold medal in Weightlifting)

या विजयानंतर काजोलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हरियाणा येथे ५ जून रोजी पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत काजोलने ४० किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. या वजनी गटात एकूण १३ खेळाडू सहभागी झाले होते.

हेही वाचा – आर्चरीमध्ये साताऱ्याच्या आदितीची सुवर्ण कामगिरी, तर पार्थ कोरडेला रौप्यपदक

काजोलने सांगलीतील दिग्विजय इन्स्टिट्यूटमध्ये कोच मयूर सिंहासने यांचेकडे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षणानंत तिने हरियाणा येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी तिने एकूण १३ जणांचा परभाव करत विजय मिळवला. तसेच, काजोलच्या विजयामुळे महाराष्ट्राला वेट लिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले आहे. खेलो इंडिया नंतर काजोलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून काजोलने आता ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा – AUS vs SL: कर्णधार शनाकाने अखेरच्या षटकात श्रीलंकेला जिंकवले, पण मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

दरम्यान, काजोल सरगर ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. काजोलचे वडील महादेव सरगर हे पानटपरी चालवतात. तसेच, आई खानावळ चालवते. गरिब कुटुंबातून आलेल्या काजोलने गेली तीन वर्षे वेटलिफ्टिंगसाठी तयारी सुरू केली होती.


हेही वाचा – बीसीसीआयला आयपीएलच्या एका सामन्यातून मिळणार 105.5 कोटी; टीव्ही, डिजिटल हक्कांचा लिलाव