घरदेश-विदेशलक्षद्वीप, जम्मू-काश्मीरमधील बडगाम TB मुक्त; २०२५ पर्यंत देश TB मुक्त करण्याचे लक्ष्य...

लक्षद्वीप, जम्मू-काश्मीरमधील बडगाम TB मुक्त; २०२५ पर्यंत देश TB मुक्त करण्याचे लक्ष्य – केंद्रीय आरोग्य मंत्री

Subscribe

केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीप आणि जम्मू काश्मीरचा बडगाम शहर टीबीमुक्त झाल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, ‘ही एक ऐतिहासिक कामगिरी असून त्याची आता सुरुवात झाली आहे. मला विश्वास आहे २०२५ वर्षापर्यंत भारत टीबी मुक्त होईल. टीबी या रोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक टीबी दिन साजरा केला जातो. जर प्रत्येकास टीबी या आजाराबद्दल कल्पना असेल तर टीबीचे निर्मूलन करणे शक्य आहे. तसेच दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधणं देखील आवश्यक आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून कोरोना बाधित रुग्णांचीच संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लॉकडाउननंतर टीबीचे रुग्ण हे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. तर टीबी अर्थात क्षयरोगाच्या रूग्णांच्या तपासणीत साधारण २५ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती मिळतेय. यासोबतच लॉकडाऊन दरम्यान टीबीच्या रूग्णांची नोंदणी जवळपास एक तृतीयांश कमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी दिल्लीत दोन महिने आणि २३ दिवसांत २० हजार ३३७ इतक्या टीबीच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत २५.३६ टक्क्यांनी कमी आहे. एका अहवालात असेही म्हटले की, कोरोना कालावधीत जगभरातील क्षयरोगाच्या रूग्णांची संख्या २५ टक्क्यांनी घटली आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -