घरक्रीडाBWF World Championships 2021: जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये किदांबी श्रीकांतची सेमीफायनलमध्ये धडक

BWF World Championships 2021: जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये किदांबी श्रीकांतची सेमीफायनलमध्ये धडक

Subscribe

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताने दोन पदकं मिळवली आहेत. स्पेनमधील हुलेवामध्ये पूर्वउपांत्य फेरीत किदांबी श्रीकांतने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. श्रीकांतसह लक्ष्य सेनने देखील सेमी फायनलमध्ये एन्ट्री घेत भारताला दोन पदकं मिळवून दिली आहेत. श्रीकांतने नेदरलँडसच्या मार्क कालजाऊला २६ मिनिटांपर्यंत सुरू असलेल्या सामन्यात २१-८, २१-७ ने मात केली आहे. तर लक्ष्य सेनने चीनच्या जुन पेंग झाऊला २१-१५, ५१-२१, २२-२० अशी मात केली आहे. उद्या (शनिवार) सेमीफायनलमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये सामना खेळला जाणार आहे.

- Advertisement -

पहिल्यांदा श्रीकांतचा सामना कालजाऊसोबत झाला होता. श्रीकांतने पहिल्यापासूनच खेळामध्ये दबदबा निर्माण केला होता. श्रीकांतने आपली उत्कृष्ट खेळी करत स्पीड आणि डच खेळाडूंना पुढे जाऊन दिलं नाही. त्यामुळे श्रीकांतने पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात श्रीकांतने खेळात ११-३ अशी आघाडी मिळवली होती.

किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पदक मिळवणारे चौथे किंवा पाचवे भारतीय खेळाडू आहेत. १९८३ मध्ये प्रकाश पादुकोणने कांस्य जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये साई प्रणीतने कांस्य पदक जिंकलं होतं. तर पी.व्ही. सिंधू या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Hockey, India Vs Pakistan: एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकला ३-१ ने हरवलं, हरमनप्रीतची उत्कृष्ट खेळी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -