घरताज्या घडामोडीNew Virus: कोरोना रुग्णांमध्ये आता नवं संकट; 'या' नव्या व्हायरसमुळे देशात एकाचा...

New Virus: कोरोना रुग्णांमध्ये आता नवं संकट; ‘या’ नव्या व्हायरसमुळे देशात एकाचा मृत्यू!

Subscribe

देशात कोरोना व्हायरसनंतर आता आणखी एक नवं संकट आल्याचे समोर आले आहे. म्युकरमायकोसिसनंतर दिल्लीतील के सर गंगाराम रुग्णालयाने आता कोरोना रुग्णांमध्ये सायटोमेगालो व्हायरस (सीएमवी) आढळल्याचा खुलासा केला आहे. देशात पहिले सीएमवीचे रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनावरील उपचार घेतल्यानंतर रुग्णांच्या पोटात वेदना आणि मलमार्गातून पडते रक्त या समस्येमुळे दाखल केले गेले आहे. यामधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, ज्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यामध्ये आतापर्यंत बुरशी झाल्याचे प्रकरणे आढळल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु आता कमी प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांमध्ये सीएमवी संक्रमण आढळले आहे. पण अजूनपर्यंत याच्या कारणांबाबत काही समजले नाही आहे.

- Advertisement -

रुग्णालयातील वरिष्ठ डॉ. अनिल अरोरा यांनी सांगितले की, ‘दुसऱ्या लाटेदरम्यान बाधितांमध्ये सीएमवीच्या केसेस अचानक समोर येऊ लागल्या. गेल्या ४५ दिवसांमध्ये ही परिस्थिती समोर आली. उपचाराच्या २० ते ३० दिवसांनंतर रुग्णांच्या पोटात वेदना आणि मलमार्गातून रक्त वाहत असल्याच्या समस्या दिसून आल्या. जेव्हा या रुग्णांनाबाबत वैद्यकीय अभ्यासात पाहिले गेले तर, देशात आतापर्यंत अशा केसेस समोर आल्या नाहीत. पहिल्यांदा हे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण दिल्ली आणि त्या लगतच्या राज्यातील आहेत.’

ते पुढे म्हणाले की, ‘बुरशीप्रमाणे, स्टिरॉइडयुक्त औषधांचा जास्त वापर हा एक प्रमुख घटक असू शकतो कारण ही औषधे प्रतिकारशक्ती कमी करतात आणि यामुळे असामान्य कोरोना संक्रमणास बळी पडले जाते. सायटोमेगालो व्हायरस भारतीय लोकसंख्येच्या ८० ते ९० टक्के लोकांमध्ये कोणतीही हानी पोहोचविल्याशिवाय अस्तित्वात आहे. कारण आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत आहे.’

- Advertisement -

दिल्लीत गंगराम रुग्णालयात दाखल असलेल्या या ५ रुग्णांचे वय ३० ते ७० वर्षांदरम्यान आहे. यामधील चार रुग्णांमध्ये मलमार्गातून रक्त येण्याची समस्या आहे आणि एका रुग्णात आतड्यांसंबंधी अडथळा येण्याची समस्या आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, कारण जास्त रक्तस्राव होत आहे. तर एका रुग्णावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. दुसऱ्या रुग्णांचा तर मृत्यू झाला आहे. दिलायादायकबाब ही आहे की, चार पैकी तीन रुग्णांना अँटीव्हायरल थेरेपीच्या माध्यमातून उपचार करणे सफल झाले आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -