घरCORONA UPDATEभारतासाठी पुढील चार महिने धोक्याचे

भारतासाठी पुढील चार महिने धोक्याचे

Subscribe

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. भारतातही करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यामुळे संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण तरीही देशभरात आतपर्यंत ६९४ लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान जगातील सर्वात मोठ्या संशोधन संस्थेने भारतासाठी पुढील चार महिने धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. तसेच भारताने यासाठी काय करणे अत्यावश्यक आहे यासंबंधी मार्गदर्शनही केले आहे.

अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अँड सेंटर फॉर डिसीज डायनेमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी’ (CDDEP) या संस्थेने भारतातील करोना संसर्गावर संशोधन केले. यासाठी भारतातील विविध वेबसाईटवरिल माहितींचा हवाला घेण्यात आला. त्यानंतर पुढील चार महिने भारतासाठी धोक्याचे असल्याचा इशारा या संस्थेने दिला आहे. या संशोधनानुसार भारतात करोनाचा कहर जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहील्या आठवड्यापर्यंत संपेल. यादरम्यान एप्रिल ते मे महिन्यापर्यंत करोना भारताला विळखा घालेल. या कालावधीत भारताची दाट लोकसंख्या पाहता तब्बल २५ लाख लोकांना करोनाची लागण होईल. परिस्थिती इतकी गंभीर होईल कि रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. कारण भारतात करोनाची लागण नक्की किती लोकांना झाली हे अजूनही अस्पष्ट आहे. तसेच भारतात अनेकजणांना क्वारनटाईन करण्यात ालेले आहे. त्यातील कितीजणांना लागण झाली ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

- Advertisement -

भारतातही वृद्ध नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी लॉकडाऊन जेवढ्या कालावधीचा असेल तेवढे नागरिक सुरक्षित असतील. तसेच भारताची लोकसंख्या पाहता येणाऱ्या काही दिवसात येथे १० लाख व्हेंटीलेटरची गरज असेल. पण सध्या भारतात ३० ते ५० हजारच व्हेंटीलेटर आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेत १.६० लाख व्हेंटीलेटरही आज कमी पडत आहेत . यावरूनच भारतात करोनाने आक्रमक रुप धारण केले तर काय भयानक परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज लावता येईल असेही CDDEP ने आपल्या संशोधन अहवालात नमूद केले आहे.

येत्या तीन महिन्यात भारतातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे. यासाठी चीन व इतर देशांप्रमाणेच भारतालाही रुग्णालये उभारावी लागतील. या रुग्णालयांमधून करोनाचा संसर्ग होणार नाही याची विशेष खबरदारी भारताला घ्यावी लागणार आहे. असेही या संस्थेने सांगितले असून भारताला करोनाविरोधात लढण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -