भारतात भूकंप येण्याची शक्यता, NGRIच्या शास्त्रज्ञाने दिला इशारा

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे आणि उत्तरकाशीमध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे भारतातील भूकंपशास्त्रज्ञ सतर्क झाले आहेत. हैदराबादस्थित एनजीआरआयच्या मुख्य शास्त्रज्ञाच्या मते, भारतीय प्लेट सरकल्यामुळे हिमालयीन प्रदेशात भूकंपाचा धोका वाढत आहे.

एका हवामानशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञाने इशारा दिला आहे की, भारतीय टेक्टोनिक प्लेट दरवर्षी 5 सेमी वेगाने सरकत आहे. त्यामुळे हिमालयातील तणाव वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात भूकंपाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

२१ फेब्रुवारीला भूकंपशास्त्रज्ञ आणि हैदराबादस्थित जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (एनजीआरआय) प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन पूर्णचंद्र राव म्हणाले की, पृथ्वीचा बाह्य भाग वेगवेगळ्या प्लेट्सने बनलेला आहे आणि ते सतत हलत असतात. भारतीय प्लेट दरवर्षी 5 सेमी पुढे सरकत आहे. त्यामुळे हिमालयातील तणाव वाढत असून भूकंपाचा धोका वाढत आहे.

हा परिसर संवेदनशील

उत्तराखंडमध्ये 18 सिस्मोग्राफ स्टेशनचे मजबूत नेटवर्क आहे. उत्तराखंडसह, हा भाग हिमाचल आणि नेपाळच्या पश्चिमेकडील भूकंपीय अंतर म्हणून ओळखला जातो. हा परिसर भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील असून येथे कधीही भूकंप होऊ शकतो. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून 56 किमी उत्तरेस 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला होता.

हिमाचलमध्ये भूकंपाची नोंद

हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून 56 किमी उत्तरेस 3.6 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोल अंतरावर होता. 19 फेब्रुवारीला आंध्र प्रदेशातील नंदीग्राममध्येही भूकंपाची नोंद झाली होती. यामध्ये कोणतीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही.


हेही वाचा : पुढील महिन्यात बँका राहणार १२ दिवस बंद; ग्राहकांनो लवकर उरका आपली कामे