घरदेश-विदेश'पाय'च आहेत तिचं शस्त्र; तिच्या जिद्दीला सलाम

‘पाय’च आहेत तिचं शस्त्र; तिच्या जिद्दीला सलाम

Subscribe

कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या 'ति'ने हायर सेकंडरीसह डीसीए आणि आयटीआयच्या परिक्षाही पायांनीच दिल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा फोटो व्हायरल होतो आहे. ही महिला मध्यप्रदेशच्या भोपाळमधील रहिवाशी असून, इंटरनेटवर तिच्या जिद्दीचं आणि आत्मविश्वासाचं लोक कौतुक करत आहेत. निधी गुप्ता असं या महिलेचं नाव असून निधीला जन्पापासूनच दोन्ही हात नाहीत. मात्र, या अंपगत्वावर मात करुन निधी आपलं जीवन सुखाने जगत आहेत आणि मुख्य म्हणजे स्वत: मेहनत करुन स्वत:चं पोट भरत आहे. आपल्याला हात नाहीत म्हणून रडत न बसता निधी तिच्या पायाने घरातील अनेक कामं करते. अदगी सहजपणे ती ही सर्व कामं करते. मात्र, विशेष म्हणजे निधी आपल्या पायाने सुईत धागा ओवण्याचं कामही करु शकते. खरंतर ती पायाच्या साहाय्याने अगदी सराईतपणे ती सुईमध्ये धागा ओवते. बहुतांशी आपल्या आयुष्यात येणाऱ्या लहान-मोठ्या संकटांमुळे खचून जातात, आपल्यातली जिद्द आणि आत्मविश्वास हरवून बसतात. मात्र, निधीने सांगते की मी नशिबाला दोष देत नाही, जे माझ्या नशीबात होतं ते झालं पण आता मी त्याच्यावर मात करुन माझ्या पायांना माझा आधार बनवलं आहे. आयुष्याच लहान-सहान गोष्टींचा बाऊ करणाऱ्या लोकांसाठी निधी सारख्या महिलांचं उदाहरण खरोखरच प्रेरणदायी आहे.

‘पायाने’ देते परीक्षा, बनवते जेवण

गोरबगाव येथे राहणाऱ्या निधीला हात नसले तरी आपल्या पायांच्या जोरावर ती जीवनाचा गाडा चालवते. घरखर्च चालवण्यासाठी म्हणून खास निधीने शिवणकलेचं काम शिकून घेतलं. निधी अत्यंत सफाईदारपणे पायाने शिवणकलेचं काम करते आणि आपला घरखर्च चालवते. या कामात तिच्या कुटुंबाची तिला पूर्ण साथ मिळते. निधी कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. तिने हायर सेकंडरीसह डीसीए आणि आयटीआयच्या परिक्षाही पायांनीच दिल्या आहेत. यात ती उत्तीर्णही झाली. अभ्यास आणि इतर कामांसोबत निधी तिच्या पायांनी मदतीने उत्तम जेवणही बनवते. निधीची ही जिद्द आणि भन्नाट हिंमत पाहून, मध्य प्रदेशचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी तिला दत्तक घेतलं आहे. त्यांच्याकडूनच तिच्या शिक्षणाच्या खर्च केला जात आहे.


वाचा: देसी गर्लच्या लग्नात प्राण्यांचा छळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -