घरमनोरंजनदेसी गर्लच्या लग्नात प्राण्यांचा छळ- PETA

देसी गर्लच्या लग्नात प्राण्यांचा छळ- PETA

Subscribe

प्रियांकाने तिच्या लग्नामध्ये मुक्या प्राण्यांचा वापर करुन घेतल्यामुळे 'पेटा' (PETA) या प्राणी मित्र आणि सुरक्षा संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे.

जोधपूर येथील उमेद भवनमध्ये ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. ३० नोव्हेंबरपासून लग्नापूर्वीच्या समारंभाना सुरुवात झाली आणि २ डिसेंबरला प्रियांका आणि जोन्स विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर कालचे हे नवविवाहीत जोडपं वेडिंग रिसेप्शनसाठी जोधपूररहून दिल्लीला रवाना झालं. यावेळेचा त्यांचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दरम्यान, प्री-वेडिंग समारंभांपासून ते उमैद भवनसारख्या आलिशान विवाह स्थळापर्यंत एक ना अनेक कारणांमुळे प्रियांका आणि निकचं लग्न चर्चेचा विषय ठरलं. जगभरातील लाखो-करोडो लोक देसी गर्लच्या लग्नाचे अपडेट्स मिळवण्यासाठी उत्सुक असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हे लग्न जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत होतं. मात्र, आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच मुद्द्यावरुन एका प्रियांका-निक वेडिंग चर्चेत आलं आहे. प्रियांकाने तिच्या लग्नामध्ये मुक्या प्राण्यांचा वापर करुन घेतल्यामुळे ‘पेटा’ (PETA) या प्राणी मित्र आणि सुरक्षा संस्थेने नाराजी व्यक्त केली.

‘पेटा’ने या मुद्द्यावरुन प्रियांका आणि निकला उद्देशून एक ट्वीटदेखील केले आहे. प्रियांकाच्या लग्नात एका घोड्याचा वापर करण्यात आला होता. नेमक्या या मुद्द्यावरुन पेटाने देसी गर्लवर निशाणा साधला आहे. याचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करत ‘PETA’ने घोड्याच्या वापराविरोधात आक्षेप नोंदवला आहे.

- Advertisement -


पेटाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, लग्न सोहळ्यात प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारचे साधन वापरले जाते आणि त्याचा प्राण्यांना कसा त्रास होतो हे दाखवण्यात आलं आहे. ‘तुमच्या लग्नाचा तुम्हाला आनंद असला तरी प्राण्यांसाठी मात्र हा दिवस नक्कीच चांगला नाही’, अशा अर्थाचा संदेश त्यांनी या व्हिडिओमध्ये लिहीला आहे. याआधी प्रियांका आणि निकचं लग्न, विवाहसोहळ्यात फटाक्यांची आतीषबाजी केल्यामुळे चर्चेचा विषय बनलं होतं. फटाके उडवणं हानिकारक आणि त्रासदायक असल्याचं सांगणाऱ्या प्रियांकाने स्वत:च्याच लग्नात आतीषबाजी केल्यामुळे, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर टीकेची झोड उठली होती. अशातच आता ‘PETA’ या प्राणीमित्र संघटनेने नोंदवलेल्या या आक्षेपामुळे पुन्हा एकदा निक-प्रियांकाचं वेडिंग वादात सापडलं आहे. दरम्यान, आता प्रियांका या वादावर काय प्रतिक्रीया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

तयारी ग्रँड रिसेप्शनची… 

सध्यातरी विवाहबंधनात अडकलेलं हे जोडपं जोधपरहून रवाना होऊन राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालं आहे. सूत्रांनुसार, दिल्लीमध्ये प्रियांका आणि निकच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन होणार आहे. मध्यंतरी समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि निक त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईमध्ये देणार होते. त्यामुळे आता रिसेप्शन दिल्लीत होणार, मुंबईत होणार की दोन्ही ठिकाणी? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नक्कीच पडला असणार. रिसेप्शन कुठेही असलं तरी ते प्रियांका-निकला शोभेल असं ‘ग्रँड’ रिसेप्शन असणार यात काहीच शंका नाही.

priyanka and nick on Jodhpur airport
जोधपूर विमानतळावर प्रियांका आणि निक (सौ.-सोशल मीडिया)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -