रुपया घसरत नाहीय, डॉलर वधारतोय; अमेरिकेतील पत्रकार परिषदेत सीतारामन यांची माहिती

FM Nirmala Sitharaman Announcement
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपया घसरत आहे. मात्र, यावर उत्तर देताना देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, ही रुपयाची घसरण नाही तर डॉलर वधारत आहे. रुपयाची घसरण होण्यापासून आरबीआय प्रयत्न करत असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं. निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

हेही वाचा – फळे-भाज्यांच्या किमती कडाडल्या; महागाईच्या दरात ०.४१ टक्क्यांनी वाढ

रुपया सातत्याने घसरत असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, रुपया घसरत आहे अशा दृष्टीने मी पाहत नाही. मात्र, डॉलरची किंमत मजबूत होत अशा अर्थाने मी रुपयाच्या घसरणीकडे पाहते. डॉलर वधारल्याने त्यांच्या तुलनेत कमी असलेल्या चलनात घसरण होणार. इतर देशांच्या तुलनेत भारतीय चलन चांगली कामगिरी करत आहे. तसंच, रुपयाची घसरण थांबवण्याकरता भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्नशीर आहे, असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

आम्ही क्रिप्टोकरन्सीच्या प्रकरणी जी२० देशांसोबत चर्चा करणार आहोत. त्यामुळे या विषयावर जागतिक स्तरावर चर्चा होऊ शकेल. या चर्चेतून जागतिक स्तरावर एसओपी तयार केली जाईल, असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

हेही वाचा – मोठी बातमी! अदानी ग्रुपला दूरसंचार सेवेसाठी मिळाला परवाना; ‘या’ राज्यांतील ग्राहकांना मिळणार लाभ