घरदेश-विदेशसांडपाण्यापासून तयार केलेल्या ग्रीन हायड्रोजनवर ट्रक आणि कार चालवणार - नितीन गडकरी

सांडपाण्यापासून तयार केलेल्या ग्रीन हायड्रोजनवर ट्रक आणि कार चालवणार – नितीन गडकरी

Subscribe

केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता एक नवीन मास्टर प्लॅन सांगितला आहे. पेट्रोल-डिझेल नाही तर ग्रीन हायड्रोजनवर (Green Hydrogen) बसेस, ट्रक आणि कार चालवण्याचा प्लॅन आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती केली जाईल, असं गडकरी यांनी सांगितलं.

ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार तयार करण्यात आली आहे. ही कार ऑईल रिसर्च इन्स्टिट्यूट, फरिदाबाद यांनी बनवली असून त्यांच्याकडून ती विकत घेतली आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीमध्ये ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार चालवणार असल्याचं देखील सांगितलं. ते नॅशनल समिट ऑन फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी ग्रीन हायड्रोजनसंदर्भात मार्गदर्शन केलं.

- Advertisement -

आपण ग्रीन हायड्रोजनला पर्यायी इंधन म्हणून वापरू शकतो. त्यावर बसेस, ट्रक आणि कार देखील चालवता येतील, असं नितीन गडकरी म्हणाले. मी ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार विकत घेतली असून दिल्लीत चालवणार आहे. आऊट ऑफ बॉक्स जाणाऱ्या संकल्पना स्वीकारायला लोक लवकर तयार होत नसल्याची खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

सांडपाणी विकून नागपूरची ३२५ कोटी कमाई

नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका प्रकल्पाची माहिती देताना सांडपाणी विकून नागपूरला ३२५ कोटी मिळतात, अशी माहिती दिली. नागपूरमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या वीज प्रकल्पाला सांडपाणी विकून नागपूरला ३२५ कोटी रुपये मिळतात असं सांगत कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते, असं गडकरी म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -