Nitin Gadkari : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रकबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रकबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. तसेच आपण लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric tractor) आणि ट्रक (Truck) लॉन्च करणार असल्याचं त्यांनी पुण्यात बोलताना म्हटलं आहे. परंतु त्यांच्या घोषणेवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. परंतु याआधी वीजेचा (Electric) प्रश्न सोडवा त्यानंतर घोषणा करा, असा सल्ला सुद्धा त्यांना अनेकांनी दिला आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रकही लॉन्च करणार

आज पुण्यात वसंतदादा साखर इन्स्टिट्युट (Vasantdada Sugar Institute) येथे साखर परिषद-२०२२ उद्घाटन झाले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी ऊस शेती, साखर कारखाने, इथेनॉल निर्मिती यावर भाष्य केले. सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्यामध्ये दुचाकीची सर्वाधिक मागणी केली जात आहे. वाहन उत्पादक कंपनी देखील कमी किमतीत दर्जेदार वाहन उत्पादन करण्यावर भर देत आहेत. त्यामध्ये आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक देशात लॉन्च होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

इथेनॉल आणि मिथेनॉल या पर्यायी इंधनानंतर आता इलेक्ट्रिक वाहनं हे भविष्य असणार आहे. तीन वर्षांपूर्वी मी जेव्हा ई व्हेईकल्स वापरासंबंधी बोललो होतो, तेव्हा लोकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण आता ई-व्हेईकल्सला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. तसेच लोकं इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी वेटिंगला आहेत. त्यामुळे आता इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रकही लॉन्च करणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे.

देशात २५ लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलला सारख्या इंधनाला इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रीक या पर्यायांना खूप वाव आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.


हेही वाचा : Gautam Gambhir in IPL: खासदार असतानाही गौतम गंभीर करतोय IPLमध्ये काम, जाणून घ्या काय आहे गुपित?