घरCORONA UPDATECoWIN अँपवर आता ४ आकडी Security Code, लसीसाठी बुकिंग, अपॉईंटमेंट होणार सुलभ

CoWIN अँपवर आता ४ आकडी Security Code, लसीसाठी बुकिंग, अपॉईंटमेंट होणार सुलभ

Subscribe

८ मे पासून लसीकरण नोंदणीमध्ये नवीन सिस्टम

देशात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु आहे. लसींची कमतरता असल्याने अनेक लसीकरण केंद्रावरुन नागरिक परत जात आहेत. लसीकरण करण्यासाठी कोविन पोर्टवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. बऱ्याच ठिकाणी असे आढळून आले की, नागरिकांनी कोविन पोर्टद्वारे लसीसाठी रजिस्ट्रेशन केले मात्र लसीसाठी दिलेल्या दिवशी दिलेल्या वेळी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेलेच नाही. मात्र त्यांनी SMSद्वारे सांगण्यात आले की त्यांना लस देण्यात आली आहे. व्हॅक्सिनेटर चुकीच्या पद्धातीने लोकांना लसीकरण झाल्याची माहिती देत आहे. अशाप्रकाचे गैर व्यवहार किंवा चुकीची माहिती नागरिकांना देऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविन सिस्टम ८ मे पासून लसीकरण नोंदणीमध्ये नवीन सिस्टम आणत असल्याचे, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कोविन पोर्टवर लसीसाठी रजिस्ट्रेशन करताना चार आकडी सिक्युरिटी कोड देण्यात येईल. याची माहिती लसीकरणकर्त्याला असणार नाही. लसीकरणकर्ता लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस देण्याआधी हा चार आकडी सिक्युरिटी कोड विचारेल. सिक्युरिटी कोड योग्य असल्यास त्याची नोंद करण्यात येईल त्यांना लसीकरण केले जाईल. ही नवीन सिस्टिम केवळ त्या नागरिकांसाठी असेल जे ऑनलाईन पद्धतीने लसीसाठी स्लॉट बुकींग करत आहेत. चार अंकी सिक्युरिटी कोडची पावती देखिल छापली जाईल. अपॉइंटमेंट बुकींग कन्फर्म झाल्यानंतर चार अंकी कोड पाठविण्यात येईल. त्यानंतर अपॉइंटमेंट एक्नॉलेजमेंट स्लिप सेव्ह करुन मोबाईलमध्ये दाखवली जाईल.

- Advertisement -

या नवीन सिस्टिममुळे लसीसाठी ऑनलाईन बुकींग करणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणाची नोंद योग्यरित्या केली जात आहे का हे कळण्यास मदत होईल. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणाऱ्या नागरिकांची योग्य नोंदणी होत आहे का त्याचप्रमाणे कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी होणारा गैरव्यवहार किंवा फसवणूक कमी होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला 

  • नागरिकांनी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाताना चार अंकी सिक्यरिटी कोड किंवा अपॉइटमेंट स्लिप घेऊन जाणे गरजेचे आहे. लसीकरण प्रक्रिया सहजपणे पूर्ण करण्यासाठी चार अंकी सिक्युरिटी कोड दाखवणे गरजेचे आहे.
  • लस घेण्याआधी चार अंकी कोड लसीकरण करणाऱ्याला दाखवणे गरजेचे आहे. कारण त्यानंतरच तुम्ही लसीकरण केले असल्याचे डिजीटल प्रमाणपत्र तयार केले जाईल.
  • लस घेतल्यानंतर नागरिकांनी लस घेतल्याचा SMS आपल्याला आला आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुमचे डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र तुम्हाला मिळाले का हे पाहणेही महत्त्वाचे आहे. लसीकरण पूर्ण झाल्याचा SMS तुम्हाला आला नाही तर त्वरित लसीकरण केंद्राशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – लसीचा पुरवठा पुरेसा नाही, परदेशी उत्पादकांना परवानगी द्या; टोपेंची केंद्राला विनंती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -