घरदेश-विदेशआता काही सेकंदात मिळणार Covid-19 रिपोर्ट; इस्रायली तंत्रज्ञान भारतात ठरणार प्रभावी

आता काही सेकंदात मिळणार Covid-19 रिपोर्ट; इस्रायली तंत्रज्ञान भारतात ठरणार प्रभावी

Subscribe

देशात कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नसून कोरोना संसर्ग पसरू नये, यासठी देशभरात कोरोना चाचणी वेगाने सुरू आहे. मात्र या कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळण्यासाठी काही तासांची वाट पाहावी लागायची. कोरोना सारख्या जीवघेण्या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाचणीचा रिपोर्ट आता एका मिनिटापेक्षा कमी वेळात उपलब्ध होणार आहे. हे तंत्रज्ञान येत्या आठवड्यापासून देशात सुरू होणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून देशात पसरलेल्या कोरोना महामारीने बाधित लोकांना त्वरित शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान एक मोठा बदल असल्याचे सिद्ध होणार आहे. त्यामुळे आता काही सेकंदात Covid-19 रिपोर्ट मिळणार असल्याने बाधित रूग्णांचं निदान लवकर होणार आहे. हे तंत्रज्ञान इस्रायलने विकसित केलं असून ते भारतात प्रभावी ठरणार आहे.

बहुराष्ट्रीय कंपनी अ‍ॅबॉट ही कंपनी वेगात होणारी कोरोना चाचणी लवकरच सुरू करणार आहे. तर मेडिसर्कल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही मुंबईची कंपनी काही सेकंदात स्वॅब किंवा गार्गलिंग वॉटर कोरोना चाचणी करण्याचे तंत्रज्ञान आहे. या तंत्राचा शोध इस्त्राईलने लावला आहे. हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांनीही आपले नवीन तंत्रज्ञान आरटी-एलएएमपीकडे हस्तांतरित केले आहे. या तंत्रामुळे आरटी-पीसीआर चाचणीला आता फक्त ३ तास लागणार आहे. तर आतापर्यंत अशा चाचण्यांना ४ ते ६ तास लागत होते.

- Advertisement -

मेट्रोपोलिस लॅबोरेटरीचे विज्ञान व प्रमुख डॉ. निलेश शहा यांनी सांगितले की, गेल्या १५ ते १६ महिन्यांत कोरोनाच्या तपासणीत बराच बदल झाला आहे. आरटी-पीसीआर चाचणी अद्याप सर्वात विश्वासार्ह मानली जात आहे. पण त्यातही बरीच बदल झाला आहे. ही तपासणी करण्यासाठी आता कमी वेळ आणि मनुष्यबळ आवश्यक असते.नव्या पद्धतीने आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट केवळ ५ मिनिटांत मिळणार आहे. त्यासाठी सध्या साडेचार हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात आहे. युएईसारख्या काही देशांमध्ये आरटी-पीसीआर रिपोर्टची मागणी केली जाते. हा रिपोर्ट बोर्डिंग करण्यापूर्वी चार तास आधी जमा केला जातो. त्यामुळे नागरिकांना देशाबाहेर प्रवास करण्यासाठी अशा प्रकारची चाचणी केली जाते.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -