घरCORONA UPDATEकोरोनामुळे 'या' राज्याने वाढवला लॉकडाऊन

कोरोनामुळे ‘या’ राज्याने वाढवला लॉकडाऊन

Subscribe

देशातील एका राज्याने लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत म्हणजे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील एका राज्याने हा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

 

देशभरात लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने लॉकडाऊन येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे राज्य देशातील पहिले राज्य ठरले असून राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

- Advertisement -

नवीन पटनाईक काय म्हणाले?

‘राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था १७ जूनपर्यंत बंद राहतील. त्यासोबतच त्यांनी केंद्र सरकारला ३० एप्रिलपर्यंत रेल्वे आणि हवाई सेवा सुरु न करण्याचे आवाहन’ देखील केले आहे.

ओडिशामध्ये ४५ रुग्ण

ओडिशामध्ये आतापर्यंत ४५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. तर यातील दोन जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

अंतिम निर्णय होण्याची शक्यता

एकीकडे केंद्र सरकार देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा विचार करत असताना ओडिशा सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजकीय पक्षांशी बोलताना सांगितले की,’ १४ एप्रिलला लॉकडाऊन हटविणे शक्य नाही’. शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – धोक्याचा इशारा; इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -