घरताज्या घडामोडीअखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे

Subscribe

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील (अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळ) सरचिटणीसपदी प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्षपदी प्रमोद बळवंत जाधव, वि.चिटणीसपदी अतिश गायकवाड यांची निवड झाली आहे.

निवड निर्णय अधिकारी अँड. प्रविण गोगावले यांनी निवड झालेल्यांची नावे वाचून दाखविली. तसेच त्या नावाला राज्यांच्या मराठा महासंघाच्या सर्व साधारण सभेने मंजुरी दिली.

- Advertisement -

सदर निवडणूक प्रक्रियेला काही व्यक्तीनी मुंबई सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. मात्र, त्यास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंर आज (दि.२९) पंढरपूर येथे सर्वसाधारण सभा पडली. या सभेला राज्याच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

३ लाख कुटुंबापर्यंत संपर्क साधून महासंघाची संघटनात्मक बांधणी करून महासंघ यापुढे मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न, सामाजिक सलोखा, उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कृषी याविषयावर मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : “जोड्याने मारलं पाहिजे याला..;” बागेश्वर बाबांवर जितेंद्र आव्हाड कडाडले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -