घरताज्या घडामोडीभारतात Omicron च्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात, मेट्रो शहरांमध्ये संक्रमण अधिक - INSACOG

भारतात Omicron च्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात, मेट्रो शहरांमध्ये संक्रमण अधिक – INSACOG

Subscribe

SARS-CoV-2 तसेच जिनोम सिक्वेन्सिंगचा अभ्यास करणारी तज्ज्ञ समिती (INSACOG) ने नुकत्याच मांडलेल्या निष्कर्षानुसार भारतात तिसऱ्या लाटेअंतर्गत कोरोनाची महामारी ही कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. ओमिक्रॉनचा स्ट्रेन हा देशातील अनेक मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण पसरवत असल्याचे तज्ज्ञ समितीने स्पष्ट केले आहे. याबाबतची निरीक्षण जानेवारीच्या सुरूवातीच्या आठवड्यातच घेण्यात आली होती. याबाबतच्या तज्ज्ञ समितीच्या बुलेटिनमध्ये ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये ओमिक्रॉनमुळे कोरोना व्हायरसचे संकट हे देशातील अनेक मेट्रो शहरांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन (Community Transmission) च्या टप्प्यात असल्याचे तज्ज्ञ समितीने स्पष्ट केले आहे. तसेच देशातील रूग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याची नोंदही समितीच्या बुलेटिनमध्ये करण्यात आली आहे. देशात मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉनचे संक्रमण असल्याचा निष्कर्षही समितीने काढला आहे.

- Advertisement -

पण मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांच्या केसेस या Asymptomatic म्हणजे लक्षणे नसलेल्या आहेत. त्यामुळे या सौम्य लक्षणांमुळे रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा ट्रेंड किंवा आयसीयूमध्ये रूग्ण उपचाराची आकडेवारी तितक्या वेगाने वाढलेली नाही.

अनेक रूग्णांमध्ये कोणताही परदेशी दौरा केल्याचा इतिहास नसतानाही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे अनेक राज्यांमध्ये पहायला मिळाले आहे. परदेशी व्यक्तीच्या संपर्कात न येताही अनेक राज्यांमध्ये रूग्णांना कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या व्हेरीएंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉनचा व्हेरीएंट हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत २४ नोव्हेंबर रोजी आढळला. परिणामी देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला या संसर्गापासूनच सुरूवात झाली. देशातील आतापर्यंत व्हेरीएंटमध्ये सर्वाधिक हा व्हेरीएंट संसर्गाच्या बाबतीत अधिक वेगवान दिसून आला होता. यआधीच्या डेल्टापेक्षाही अधिक वेगवान म्हणून हा व्हेरीएंट आढळला. ओमिक्रॉनची सध्याची ओळख ही डॉमिनंट स्ट्रेन म्हणून आहे. अनेक राज्यात डेल्टाच्या ठिकाणी आता ओमिक्रॉनचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.

देशात ओमिक्रॉनचे सुरूवातीचे रूग्ण हे डिसेंबर २०२१ मध्ये आढळले. त्यानंतर ओमिक्रॉनच्या बाबतीत हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमण करण्यापेक्षा कम्युनिटी स्प्रेडने संसर्ग पसरवत असल्याचे आढळून आले. ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे दिसली आहेत. तर लक्षणे नसतानाही अनेक ठिकाणी ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे.

देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या शुक्रवारी २१ जानेवारीला ३ लाख ४७ हजार २५४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. त्यानंतर काल, शनिवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊन ३ लाख ३७ हजार ७०४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आजही देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट होऊन २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ५२५ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ५९ हजार १६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


Omicron Variant: डोळ्यासंबंधित ‘ही’ लक्षणे दिसतायत, तर करू नका दुर्लक्ष; असू शकतो ओमिक्रॉनचा संसर्ग

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -