घरदेश-विदेशशंभर टक्के इथेनॉलवर चालणारी कार बाजारात; नितीन गडकरींनी केली लॉंच

शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी कार बाजारात; नितीन गडकरींनी केली लॉंच

Subscribe

यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहले जाते. इथेनॉच्या वापराकडे चला असे म्हणणाऱ्या केंद्र सरकारधील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना आज 29 ऑगस्ट रोजी शंभर टक्के इथेनॉवर चालणाऱ्या टोयोटो कार बाजारात आणली. कारच्या लॉंचच्या कार्यक्रमावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित होते. (One Hundred Percent Ethanol Car in the Market; Launched by Nitin Gadkari)

यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी टोयोटा मिराई ईव्ही ही हायड्रोजनवर चालणारी कार लाँच केली होती. आज 100 टक्के इथेनॉलवर चालणारी (Toyota) इनोव्हा कार लॉन्च केली आहे. ही जगातील पहिली BS-VI (Stage-II), इलेक्ट्रिक फ्लेक्स-इंधनाची कार असणार आहे.

- Advertisement -

अनेक पातळीवर परिणाम करेल

कारच्या लॉंचवेळी बोलताना गडकरी म्हणाले की, इथेनॉलवर चालणाऱ्या या कारच्या निर्मिती आधी मी विविध देशाना भेटी दिल्या असून, यातून कळाले की, जैवइंधन हे आश्चर्यकारक काम करू शकते. पेट्रोलियम पदार्थांवरील आयातीचा खर्च कमी होऊ शकतो. बर्‍याच प्रमाणात परकीय चलनाची बचत होण्याची मला खात्री वाटली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा :जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका कधी घेता? सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला फटकारले

- Advertisement -

हे आहे इथेनॉलवर चालणाऱ्या कारचे वैशिष्ट्य

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही पेट्रोलऐवजी पूर्णपणे इथेनॉलवर धावणार आहे. सोबतच, ही गाडी स्वतःच इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करून, EV मोडवर देखील वापरता येणार आहे. यासाठी गाडीमध्ये एक लिथियम-आयन बॅटरी पॅकही देण्यात आला आहे. ही गाडी एक प्रोटोटाईप आहे.

हेही वाचा : मोदींकडून राखी पौर्णिमेनिमित्त महिलांना भेट; गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपात

वाढत्या प्रदुषाणाला बसू शकतो आळा

इथेनॉल हे इंधन ऊस, धान्य यासारख्या वनस्पतींपासून तयार होते. यामुळे वाढत्या प्रदुषणाला आळा बसू शकतो. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत इथेनॉची किंमत कमी आहे. देशातील 40 टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते. इथेनॉलचा वापर वाढल्यास देशातील प्रदूषण कमी होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -