घरट्रेंडिंगNeedle Phobia : इंजेक्शनच्या सुईची भीती कशी घालवाल ?

Needle Phobia : इंजेक्शनच्या सुईची भीती कशी घालवाल ?

Subscribe

१० पैकी १ व्यक्तीला वाटते इंजेक्शनच्या सुईची भीती

जगभरात कोरोनाविरोधी लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. पण कोरोनाच्या या लसीचे डोस न घेण्यासाठीही काही कारणे समोर आली आहेत. त्यामध्ये अनेक कारणांपैकी एक कारण आहे, ते म्हणजे लस देताना वापरण्यात येणारी इंजेक्शनची सुई. या Needle phobia (trypanophobia) मुळेच अनेकजण लस घेत नसल्याचे समोर आले आहे. इंजेक्शनची भीती वाटत असल्यानेच लस घेण्यासाठीही काहीजण नकार देत आहेत. लोकांमध्ये असलेल्या मानसिक परिस्थितीमुळे या गोष्टी होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. प्रत्येक १० व्यक्तींमध्ये एका व्यक्तीमध्ये हा नीडल फोबिया आढळत असल्याचे समोर आले आहे. अनेक व्यक्तींमध्ये या फोबियाची काही कारणेही समोर आलेली आहेत.

अनेक व्यक्तींच्या बाबतीत नीडल फोबिया सर्रास दिसून येतो. ज्या व्यक्तींना लोअर ब्लडप्रेशरचा त्रास आहे, अशा व्यक्तींना इंजेक्शन घेताना डोकेदुखी किंवा अवसान गळाल्यासारखे वाटते. अनेकदा इंजेक्शनच्या भीतीमुळे भरपूर विचार केल्याने अशी मानसिकता तयार होत असते, असे डॉ फॉक्स ऑनलाईन फार्मसीचे डॉ देबोराह ली सांगतात. तर अनेकांना लस घेण्याचा अनेक दिवसांपासूनचा विचारच या फोबियासाठी कारणीभूत ठरतो. सतत या गोष्टीवर विचार केल्यानेच असा फोबिया निर्माण होतो.

- Advertisement -

अनेकदा असा नीडल फोबिया तयार होण्याची काही कारणेही समोर आली आहेत. त्यामध्ये लहान वयात इंजेक्शनची भीती निर्माण होणे हे एक कारण आहे. तर दुसरे कारण म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना दीर्घकालीन उपचारामध्ये इंजेक्शनचा वापर होताना पाहणे हे कारण आहे. नीडल फोबिया हा सार्वजनिक आरोग्याच्या विषयांपैकीच एक विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा सर्वसामान्यांना भेडसावणारा विषय आहे. २०१९ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार १६ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात प्रौढांकडून इंजेक्शन घेतले जात नाही असे समोर आले होते. इंजेक्शनच्या सुईमुळेच या वर्गाकडून इंजेक्शन घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.

गुएल्फच्या कॅनडा युनिवर्सिटीतील सहाय्यक प्राध्यापक मेघॅन मॅकमुर्टी यांच्या अभ्यासानुसार वेगवेगळ्या देशात एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या अभ्यासामध्ये दहापैकी एका व्यक्तीला इंजेक्शनच्या सुईची भीती वाटते अशी माहिती समोर आली. म्हणूनच प्रशासकीय पातळीवर काही उपाययोजना व्हायला हव्यात. ज्या माध्यमातून इंजेक्शन घेण्याबाबतची भीती कमी होण्यासाठी मदत होईल. इंजेक्शन घेताना नेमकी कोणत्या गोष्टीची भीती वाटते याबाबत विचारणा करून ही भीती घालवली जाऊ शकते. त्यामुळे हा फोबिया कमी होण्यासाठीही मदत होऊ शकते असे ते म्हणाले.

- Advertisement -

नीडल फोबिया कसा दूर कराल ?

तर आणखी उपायांमध्ये अशा भीती वाटणाऱ्या व्यक्तींनी लसीकरणाच्या केंद्रावर जाऊन ही परिस्थिती अनुभवायला हवी. जेणेकरून तणाव कमी करणे शक्य होईल. तर दुसऱ्या पर्यायामध्ये गाण एकण्यासारख्या गोष्टींमुळे या तणावातून त्यांचे मन वळवणे शक्य होऊ शकते. म्हणूनच आपले लक्ष या गोष्टींमधून विचलित होऊ शकते अशा गोष्टी करण्याची गरज आहे. त्यामधूनच हा फोबिया दूर होऊ शकतो असे अभ्यासकांचे मत आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -