Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Oxygen Shortage: वैद्यकीय क्षेत्रासाठीच ऑक्सिजनचा वापर करण्याचा गृहमंत्रालयाने दिला आदेश

Oxygen Shortage: वैद्यकीय क्षेत्रासाठीच ऑक्सिजनचा वापर करण्याचा गृहमंत्रालयाने दिला आदेश

देशात ऑक्सिजनचा वापर विना वैद्यकीय क्षेत्रांसाठी करता येणार नाही

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स त्याचप्रमाणे लसीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशात अनेकांनी ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमावले आहेत. मात्र ऑक्सिजन संदर्भात गृहमंत्रालयाने काही बदल केले आहेत. केंद्रिय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्र शासित प्रदेशांना यापुढे ऑक्सिजन वापर विना वैद्यकीय क्षेत्रांसाठी केला जाणार नाही. तर केवळ वैद्यकीय कामांसाठीच ऑक्सिजनचा वापर केला जाईल असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे यात कोणत्याही उद्योगाला सुट देण्यात आलेली नाही, असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. .

देशात ऑक्सिजन अभावी लोकांचा जीव जात आहे. कोरोनाची दुसरा लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक आहे. देशासह राज्यात कोरोना रुग्णांची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशीही आपण झगडत आहोत. रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो मात्र ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर केंद्रीय गृह सचिवांद्वारे देशात ऑक्सिजनचा वापर विना वैद्यकीय क्षेत्रांसाठी करता येणार नसल्याचे आदेश जारी केले. त्याचबरोबर देशातील सर्व ऑक्सिजन बनवणाऱ्या युनिट्सना त्यांच्या क्षमतेनुसार, जास्त प्रमाणे लिक्विड ऑक्सिजन तयार करण्याचे आदेश देखिल देण्यात आले आहेत.

- Advertisement -

देशातील परिस्थिती पाहता केंद्र सरकार ऑक्सिजन पुरवठ्याबाबत फार गंभीर झाल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृह सचिवांच्या आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, लिक्विड ऑक्सिजन तयार करण्यासाठी कोणत्याही उद्योगाला सूट देण्यात आलेली नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकारावर बारिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.


हेही वाचा – Covid-19 – माणसांतून मांजरांमध्ये झाले कोरोनाचे संक्रमण!, नवा खुलासा

- Advertisement -